टेकऑफ दरम्यान जपानचं फाइटर जेट F15 रडारवरून गायब; क्रॅश झाल्याची भीती

south asia japanese fighter jet disappears from radar shortly after taking off
टेकऑफदरम्यान जपानचं फाइटर जेट F15 रडारवरून गायब; क्रॅश झाल्याची भीती

जपानचं एअर सेल्फ डिफेन्स फोर्सचे फाइटर जेट F15 गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी टेक ऑफदरम्यान हे फायटर जेट रडारवरून गायब झालं आहे. या फाइटर जेटने मध्य जपानमधील कोमत्सु एअरबेसवरून उड्डाणं केले होते. मात्र उड्डाण होताच 5 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापल्यानंतर हे विमान जपानच्या समुद्रावर दिसून आले. मात्र यादरम्यान हे विमान जपानच्या समुद्रावरून रडारवरून गायब झाले. यावेळी फायटर जेटमध्ये दोन क्रू मेंबर्स होते. हे जेट ट्रेनिंगसाठी वापरलं जात होतं. मात्र आता हे जेट अपघातग्रस्त झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान प्राथमिक तपासात ज्या ठिकाणी या फायटर जेटचा संपर्क तुटला तेथे समुद्रात काही गोष्टी वर तंरगताना दिसून आल्यात. सध्या तपास यंत्रणांकडून या फायटर जेटचा शोध सुरु आहे. तपासादरम्यान कोणती माहिती समोर येईल यावरून या फायटर जेटचे काय झाले याचा अंदाज बांधला जाणार आहे.

जपानी प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, हे फायटर जेट ज्या स्क्वाड्रनचे होते, जे प्रशिक्षणादरम्यान शत्रूच्या विमानाचे काम करते. सध्या या जेटच्या शोधासाठी युद्धपातळीवर शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

जपानच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, मध्य जपानच्या इशिकावा प्रांतामधील कोमत्सु एअरबेसवरुन या जेटने उड्डाण केल्यानंतर ते समुद्राच्यावर दिसले मात्र त्यानंतर ते रडारवरुन गायब झाले. मात्र हे जेट कोसळल्याची भीती मंत्रालयाने व्यक्त केली आहे. सध्या शोध मोहीम सुरु आहे.

जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्सचं एप-३५ ए स्टील्थ जेट 2019 साली समुद्रात कोसळले होते. या विमानाचा शोध घेण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याचं पहायला मिळतंय.


Union Budget 2022 Live Updates: लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित