अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये पुन्हा मोठा बॉम्बस्फोट; 4 जणांचा मृत्यू, 10 जखमी

south asia kabul big explosion near mosque after friday prayers 4 death 10 injured

अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये पुन्हा मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. वजीर मोहम्मद अकबर खान ग्रँड मशिदीजवळ हा स्फोट झाला आहे. यात 4 जणं ठार झाले असून 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, नमाज अदा केल्यानंतर लोक मशिदीतून बाहेर पडत असताना हा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात धुळ आणि धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे नेमका हा स्फोट कोणत्या बाजूने झाला हे काही क्षण लोकांना समजवलेच नाही.

काबूल पोलिसांच्या माहितीनुसार, स्फोटात काही लोकं ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहे. काबूल गृहमंत्र्यांचे प्रवक्ते अब्दुल नफी तकोर यांनी सांगितले की, हा स्फोट मशिदीजवळ मुख्य रस्त्यावर झाला आहे. त्यामुळे स्फोटामागची कारणे तपासली जात आहेत. पोलिसांचे पथक घटनास्थळी असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.

गेल्या काही महिन्यांत स्थानिक इस्लामिक स्टेट गटाने अफगाण शहराला लक्ष्य केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. कालही काबूलमध्ये स्फोट झाला होता ज्यात तीन जण ठार तर 13 जण जखमी झाले होते. काबूल पोलिस प्रमुखांचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी सांगितले की, हा स्फोट शहराच्या पश्चिमेकडील देहमझाग येथील एका रेस्टॉरंटमध्ये झाला. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी एक पथक परिसरात पोहोचले आहे.

या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका तरुणाचा समावेश आहे, जो परिसरातील एका फोटोग्राफीच्या दुकानात काम करत होता. या घटनेच्या काही तासांनंतर 21 सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्फोटावेळी तेथे उपस्थित असलेल्या हमीद या व्यक्तीने सांगितले की, या घटनेत त्याचे तीन मित्र मारले गेले. हमीद म्हणाले, ‘या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. आम्ही अनेकांना कारमध्ये बसवले, त्यानंतर त्यांना इस्तेकलाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.


काँग्रेसमुक्त भारत बनविणारेचं मुक्त होतील, पण.. अशोक गहलोत यांचे भाजपवर टीकास्त्र