दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एक विमान रनवेवर उतरले आणि दूरपर्यंत घसरत गेले. विमानाचा काही क्षणात दुर्घटनाग्रस्त होऊन त्यात 179 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जेजू एअरचे विमानाने थायलंडहून उड्डाण केले होते. विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. विमानाचे दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग होत असताना हा अपघात झाला.
विमानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये विमान रनवेवर उतरत असताना दूरपर्यंत घसरत जात असताना दिसते, आणि पुढील काही क्षणातच कंपाऊंडला धडकून त्याचा स्फोट होतो. विमान धडकल्यानंतर मोठा स्फोट होतो आणि त्याठिकाणाहून आगीचे लोळ उठतात.
लँडिंग गिअर नादुरुस्त
योनहाप न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार विमानात सहा क्रु मेंबर्ससोबत 181 प्रवाशी होते. 175 प्रवाशांपैकी 173 दक्षिण कोरियाचे होते, तर दोन थायलंडचे नागरिक असल्याची माहिती आहे. न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार विमानाचा लँडिंग गिअर नादुरुस्त झाला होता. त्यामुळे विमान रनवेवर घसरत गेले आणि कंपाऊंडला धडकले. स्थानिक अधिकारी विमानात आग लागण्याच्या करणांचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
जेजू एअरचे विमान 175 प्रवासी आणि सहा फ्लाइट अटेंडंट्स घेऊन थायलंडहून परतत होते आणि लँडिंग दरम्यान क्रॅश झाले. विमानतळ दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागात आहे. स्थानिक मीडियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये विमानातून धूर निघताना दिसत आहे.
⚡️DRAMATIC moment South Korean plane with reported 180+ passengers becomes a fireball and crashes at airport CAUGHT on cam pic.twitter.com/VdrdavEXgT
— RT (@RT_com) December 29, 2024
हेही वाचा : Shiv Sena UBT: मोदी-शहांचा राजयोग अस्तंगत होताना दिसतोय; 2025 मावळताना सत्तेवर नसतील; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Edited by – Unmesh Khandale