Coronavirus: आता दक्षिण कोरियात पोहोचला कोरोनाचा नवा स्ट्रेन

लंडनहून दक्षिण कोरियात आलेल्या तीन प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला.

South Korea reports its first cases of new Covid variant first seen in UK
Coronavirus: आता दक्षिण कोरियात पोहोचला कोरोनाचा नवा स्ट्रेन

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर अद्याप कायम आहे. पण यादरम्यान ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचं नवं रुप आढळलं आहे. हे कोरोना व्हायरसचं नवं रुप आता अनेक देशात पसरताना दिसत आहे. आता यामध्ये दक्षिण कोरिया देखील सामील झाला आहे. दक्षिण कोरियात लंडनहून परतणाऱ्या तीन प्रवाशांमध्ये कोरोना व्हायरसचं नवं रुप आढळलं आहे. याबाबतची कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध एजन्सीने दिली आहे. यामुळे सध्या दक्षिण कोरियात एकच खळबळ माजली आहे.

कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबरला दक्षिण कोरियात लंडनहून तीन प्रवासी नागरिक आले आणि त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसचं नव रुप आढळलं आहे. दरम्यान कोरोनाचं हे नवं रुप (स्ट्रेन) ७० टक्के अधिक संक्रमित आणि घातक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. अलीकडेच विशेष तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, हा नवा कोरोना व्हायरस मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये अधिक पसरतो.

कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध एजन्सीच्या माहितीनुसार, रविवार रात्रीपर्यंत दक्षिण कोरियात ८०८ नवे कोरोनाबाधित आढळले होते. दरम्यान दक्षिण कोरियातील हा सर्वाधिक कमी आकडा मानला जात आहे. यापूर्वी शुक्रवारी १ हजार २४१ नवे कोरोनाबाधित आढळले होते. दक्षिण कोरियात कमी चाचण्या होत असल्यामुळे कोरोनाच्या प्रकरणात घट होत आहे, असं म्हटलं जात आहे. दरम्यान ख्रिसमसमुळे लोकं सुट्टीवर होते. त्यामुळे सध्या इथे लोकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्यासारख्या नियमांचे पालन करण्यास सातत्याने सांगितलं जात आहे. अजूनपर्यंत दक्षिण कोरियात लसीकरणाला सुरुवात झाली नाही आहे. पण दक्षिण कोरियाची १ कोटी ६० नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यासाठी फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सनसोबत बातचित झाली आहे.


हेही वाचा – नव्या वर्षात प्रवासासाठी लागणार वॅक्सिन पासपोर्ट