घरताज्या घडामोडीVideo : चॅलेंज जिंकण्याच्या नादात त्याने गुप्तांगालाच आग लावली, व्हिडिओ व्हायरल

Video : चॅलेंज जिंकण्याच्या नादात त्याने गुप्तांगालाच आग लावली, व्हिडिओ व्हायरल

Subscribe

कोरोना लॉकडाऊनमध्ये सध्या इंटरनेट, सोशल मीडियावर एकमेकांना बरेच चॅलेंज देण्याचं ट्रेण्ड आहे. मात्र एखादं चॅलेंज स्विकारताना आणि देताना ते किती धोकादायक ठरू शकतं किंबहुना जीवावरही बेतू शकतं. याचा प्रत्यय तुम्हाला सोशल मीडियावर हा व्हायरल होणारा व्हिडिओ बघितल्यावर येईल.

सध्या सोशल मीडियावर अशाच एका चॅलेंजचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरूणाने चक्क या चॅलेंजपायी आपल्या गुप्तांगालाच आग लावली आहे. हा व्यक्ती म्हणजे साऊथ कोरियन गेमर शिन टाइ. हा लाइव्ह व्हिडिओ गेम खेळत होता. तो गेम हरल्यानंतर त्याला हे विचित्र चॅलेंज देण्यात आलं.  फॉल गाइज म्हणून हा गेम आहे, ज्यामध्ये शिन हरतो. त्यानंतर त्याला त्याचं गुप्तांगाला आग लावण्याचं चॅलेंज दिलं जातं. शिन हे चॅलेंज स्वीकारतो.

- Advertisement -

6 ऑगस्टचा हा व्हिडीओ आहे. एकूण साडेतीन तासांच्या व्हिडीओतील शेवटचा हा क्षण अंगावर काटा आणणाराच आहे. शिनला हे चॅलेंज स्वीकारणं चांगलंच महागात पडलं आहे.

शिन कॅमेऱ्यासमोर उभा राहतो आणि आपल्या पँटवर गुप्तांगाजवळ एक लिक्विड लावतो आणि हळूच लायटरने आग लावतो. शिन मोठ्याने ओरडतो आणि पँट आपल्या पोटापासून दूर करतो. यावेळी आग लगेच विझते. मात्र थोड्या वेळाने तो पुन्हा त्याच ठिकाणी भरपूर लिक्विड स्प्रे करतो आणि पुन्हा आग लावतो. यावेळी आग पटकन पेट घेते, शिन मोठ्याने ओरडत, रडत जमिनीवरच कोसळतो.

- Advertisement -

हे ही वाचा – Video : दहीहंडी रद्द म्हणून काय झालं; ‘ही’ गाणी ऐका आणि घरीच साजरा करा उत्सव!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -