Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश भष्ट्राचाराविरोधात पुढच्या महिन्यात लसीकरण, साऊथ सुपरस्टार कमल हासन यांनी टोचून घेतली लस

भष्ट्राचाराविरोधात पुढच्या महिन्यात लसीकरण, साऊथ सुपरस्टार कमल हासन यांनी टोचून घेतली लस

Related Story

- Advertisement -

देशात १ मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्यापाठोपाठ देशातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांनी कोरोना लस टोचून घेतली. या मंत्र्यांकडून देशातील ज्येष्ठ नागरिकांनाही लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. यातच साऊथ सुपरस्टार आणि मक्कल नीधि मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनीही मंगळवारी चेन्नईत एका रुग्णालयात कोरोना लस टोचून घेतली आहे. कमल हसन यांनी ट्विटरवर कोरोना लस घेतल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या ट्विटमध्ये भ्रष्टाचारविरोधात टीकाकरण पुढच्या महिन्यापासून सुरु होईल असे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढील महिन्यापासून ते राजकारणात पुन्हा सक्रिय होणार असल्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, मला श्री रामचंद्र रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. हे लसीकरण त्या लोकांसाठी महत्त्वाचे आहे जे दुसऱ्यांचा विचार करतात. त्यामुळे सर्वांनी कोरोना लसीकरण करुन घ्यावे. ६ एप्रिलपासून  तमिळनाडुमध्ये सुरु होणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात इशारा देत त्यांनी म्हंटले की, शरीरासाठी प्रतिकारक्षमता जरुरी आहे. या क्षमतेवर आपण पुढच्या महिन्यात भ्रष्टाचाराविरोधात लढू शकतो, तयार रहा. भ्रष्टाचारांच्या आरोपांवरुन मंत्री कमल हसन सत्तारुढ पक्षावर नेहमी टीका डागत असतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी त्यांचा पक्ष मैदानात उतरला आहे. कमल हसन यांच्या पायाला इंफेक्शन झाल्याने नुकतीच त्यांच्या पायाची सर्जरी झाली. या सर्जरीतून पुर्णपणे बरे होत कमल हासन पुन्हा निवडणुकीच्या रंगणात उतरण्यात सज्ज झाले आहे. आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी कमल हासन यांची पक्षांची जोरदार सुरु आहे. या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘बॅटरी’ आहे. परंतु ऐन निवडणुकांच्या तयारीत आजारपणामुळे हासन यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.


हेही वाचा- महाराष्ट्राचे राजकारण हादरणार, दरेकर करणार गौप्यस्फोट

 

- Advertisement -