घरताज्या घडामोडीSovereign Gold Bond: आजपासून पाच दिवस सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी देतंय सरकार,...

Sovereign Gold Bond: आजपासून पाच दिवस सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी देतंय सरकार, जाणून घ्या किती असेल किंमत?

Subscribe

जनतेला स्वस्त किंमतीत सोनं खरेदी करण्याची संधी आता सरकार देत आहे. ९ ऑगस्ट म्हणजेच आजपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond) या योजने अंतर्गत बाजारातील किंमतीपेक्षा कमी किंमतीत गुंतवणूकदार सोनं खरेदी करू शकतात. ही योजना फक्त ५ दिवसांसाठी (१३ ऑगस्ट) खुली राहणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर उशीर करू नका.

या सोनं विक्रीवर होणाऱ्या लाभावर आयकर नियमांतर्गत सूटसह बरेच लाभ मिळतील. सरकारकडून गोल्ड बॉन्डची गुंतवणूकीसाठी आर्थिक वर्ष २०२१-२२मधील पाचवी मालिका आहे. आर्थिक मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की, ‘सॉवरेन गोल्ड बॉन्ड मेपासून सप्टेंबरदरम्यान सहा हप्त्यांमध्ये जारी केले जाईल.’ जर तुमचा या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार आहे, तर जाणून घ्या या योजने अंतर्गत सोन्याची किंमत किती आहे?

- Advertisement -

सोन्याची किंमत इतकी असणार…

या योजने अंतर्गत तुम्ही ४ हजार ७९० रुपये प्रति ग्रॅम सोनं खरेदी करू शकता. म्हणजे जर तुम्ही १० ग्रॅम सोन खरेदी करता तर त्याची किंमत ४७ हजार ९०० रुपये असेल. महत्त्वाचे म्हणजे गोल्ड बॉन्डची खरेदी ऑनलाईन पद्धतीने केली तर सरकार अशा गुंतवणूकदारांना ५० रुपये प्रति ग्रॅमची अतिरिक्त सूट देईल. यामध्ये, अर्जांचे पेमेंट डिजिटल माध्यमातूनद्वारे करावे लागते. ऑनलाईन सोनं खरेदीवर गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम सोनं ४ हजार ७४० रुपयांना पडेल. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याची किंमत ४७ हजार ४०० रुपये होईल.

या योजने अंतर्गत किती व्याज मिळेल?

गोल्ड बॉन्डचा कालावधी आठ वर्षांचा असतो आणि त्याला दरवर्षी २.५ टक्के व्याज मिळते. बॉन्डवर मिळणारे व्याज गुंतवणूकदाराच्या टॅक्स स्लॅबनुसार करपात्र असते. परंतु यावर स्त्रोत (TDS) कर कापला जात नाही.

- Advertisement -

कुठून गुंतवणूक करू शकता?

गोल्ड बॉन्ड बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसएचसीआयएल), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज (एनएसई आणि बीएसई)च्या माध्यमातून विकले जाईल. सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना नोव्हेंबर २०१५पासून सुरू करण्यात आली होती.


हेही वाचा – Corona Vaccine: गुडन्यूज! या आठवड्यात झायडस कॅडिलाच्या लसीला मिळू शकते मंजूरी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -