घरदेश-विदेशSpace Station भारतावर पाडायचे की चीनवर?; रशियन स्पेस एजन्सीची थेट अमेरिकेला धमकी

Space Station भारतावर पाडायचे की चीनवर?; रशियन स्पेस एजन्सीची थेट अमेरिकेला धमकी

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियावर निर्बंध लादले आहेत. यातील काही निर्बंध असे आहेत की, ज्यामुळे रशियाचा स्पेस प्रोग्राम खराब होणार आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. दरम्यान अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसणार असल्याचे बायडने यांनी सांगितले आहे.

यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाच्या एरोस्पेस इंडस्ट्रीला मोठा फटका बसणार आहे. दरम्यान अमेरिकेने रशियन सैन्य, सागरी उद्योग, आर्थिक संस्था आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जवळच्या लोकांवरही बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या स्पेस प्रोग्रामवर थेट कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. परंतु काही अतिसंवेदनशील तंत्रज्ञान रशियाला निर्यात करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. ही तंत्रे स्पेस इंडस्ट्रीत वापरली जातात. सेमीकंडक्टर्स, टेलिकम्युनिकेशन्स, एनक्रिप्शन सिक्युरिटी, लेझर, सेन्सर्स, नेव्हिगेशन, एव्हिओनिक्स आणि मॅरीटाइम तंत्रज्ञान यांच्या निर्यातीवर अमेरिकेने रशियाविरुद्ध बंदी घातली आहे.

आता अमेरिकेच्या या बंदीमुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर चालू असलेल्या कामावर परिणाम होईल का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्पेस स्टेशन, ऑर्बिटल प्रवास आणि एस्ट्रोनॉट्सचे ट्रेनिंग यासाठी अमेरिका आणि रशिया यांच्यात करार झाला आहे. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांबाबत अमेरिकन अंतराळ संस्था नासाने सांगितले की, स्पेस स्टेशनवरील रशियन हालचालींवर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत.

- Advertisement -

नासा आणि रशियन स्पेस एजन्सी Roscosmos भविष्यातील अंतराळ मोहिमा एकत्रितपणे करत राहतील. आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशनचा वापर सुरू ठेवेल. अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरूच राहणार आहे. जेणेकरून स्पेस स्टेशनवर कधीही अंतराळवीरांची कमतरता भासू नये. नासाने सांगितले की, आम्ही ऑर्बिटल मिशन आणि ग्राउंड स्टेशन ऑपरेशन्सवर रशियासोबत जवळून काम करत आहोत. त्यात कोणतेही बंधन नाही.

नासाने स्पष्टपणे सांगितले की, आम्ही रशियन स्पेस एजन्सीसोबत आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आणि इतर मोहिमांची सुरक्षा पूर्ण करत राहू. अमेरिका आणि रशिया यांच्यातील अंतराळ क्षेत्रातील नागरी सहकार्य सुरू राहील. रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही.

याच दरम्यान आता Space Station भारतावर पडायचे की चीनवर? अशी विचारणा रशियन स्पेस एजेन्सी डायरेक्टरची अमेरिकेला केल्याचे समोर येत आहे. यावर CNN च्या बातमीनुसार, नासाचे हे विधान तेव्हा केले जेव्हा Roscosmos चे डायरेक्टर दिमित्री रोगोझिन यांनी अनेक ट्विटमध्ये अमेरिकेला म्हटले आहे की, जर तुम्ही ISS वर आमचे सहकार्य थांबवले तर स्पेस स्टेशनला अनियंत्रित होण्यापासून आणि अमेरिका किंवा युरोपवर कुठेतरी पडण्यापासून कोण वाचवेल? यामुळे 500 टन वजनाची ही रचना भारत किंवा चीनवर पडण्याचीही शक्यता आहे. त्यांना अशाप्रकारे तुम्हाला घाबरवायचे आहे का? ते पुढे म्हणाले की, आयएसएस रशियावरून उडत नाही, त्यामुळे धोका पूर्णपणे तुम्हाला आहे. आणि तुम्ही तो उचलण्यासाठी तयार आहात का?

दिमित्री यांनी ट्विटद्वारे विचारले की, अशा पर्यायाची माहिती देऊन भारत आणि चीनला घाबरायचे का? कारण स्पेस स्टेशन रशियावरून उडत नाही. तुम्ही यासाठी तयार आहात का? दिमित्रीच्या ऑनलाइन प्रतिक्रियेनंतर, नासाने एक विधान केले की, स्पेस स्टेशनबद्दल अमेरिका आणि रशियाचे संबंध बिघडत नाहीत. ते एकत्र काम करतील. याआधीही स्पेस स्टेशनबाबत अमेरिका आणि रशियामध्ये संघर्ष झाला आहे.


ukraine russia war : केंद्राचा मोठा निर्णय; युक्रेनसाठी विमानं तयार, सर्व खर्च सरकार उचलणार, नव्या अॅडव्हायजरी जारी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -