घरCORONA UPDATEभयंकर ! स्पेनमध्ये घरा घरामध्ये कुजत आहेत वृद्धांचे मृतदेह

भयंकर ! स्पेनमध्ये घरा घरामध्ये कुजत आहेत वृद्धांचे मृतदेह

Subscribe

जगभरात मृत्यूचे थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने चीन, इराण, इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक वृद्धांचे बळी घेतले आहेत. स्पेनमध्ये वृद्धांसाठी उभारण्यात आलेल्या old people home मध्ये कोणी काळजी घेणारेच नसल्याने अनेक करोनाग्रस्त आजी आजोबांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत घरात पडून असल्याचे भयानक चित्र पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे सरकारनेच या घरांमध्ये करोनाग्रस्त वृद्धांना मरणासन्न अवस्थेत सोडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

या मृतदेहांची व्हिलेवाट लावण्याची जबाबदारी लष्करांवर सोपवण्यात आली आहे. तसेच ज्या घरांमध्ये करोनाची लागण झालेले वृद्ध आहेत व ज्यांची काळजी घेणारे कोणीही नाही त्यांच्यासाठीच सरकारने हे ओल्ड पीपल होम उभारले आहेत. पण त्यांच्याावर उपचार करण्याची जबाबदारी मात्र सरकारने झटकली आहे. युरोपीय देशात करोनाची झपाट्याने लागण होत असल्याने दिवसेंदिवस रुग्णांच्या ,संख्येत वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर त्राण येत आहे. रुग्णालयातील व्हेंटीलेटरही कमी पडत असून अनेक डॉक्टर व नर्सेसलाही करोनाची लागण झाली आहे. यामुळे मोजक्याच व जे जिवंत राहण्याची शक्यता आहे अशाच रुग्णांना रु्गणालयात दाखल करण्यात येत आहे. वृद्ध व्यक्तींना मात्र गावकुसाबाहेर उभारण्यात आलेल्या old people home मध्ये राहण्याची सक्ती सरकारने केली आहे. त्यातच २० ते २५ वयोगटातील तरुणांनाही करोनाची लागण होत आहे. यामुळे त्यांच्यावरच तात्काळ उपचार करण्याचे आदेश सरकारने रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांना दिले आहेत.

तर काही ठिकाणी नातेवाईकचं करोनाची लागण झालेल्या वृद्धांना घरात क्वारनटाईन न करता old people home मध्ये आणून सोडत आहेत. अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा स्पेनच्या संरक्षण मंत्री मार्गारीटा रोबेल्स यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -