घरदेश-विदेशपृथ्वीच्या दिशेने वेगाने आदळणार चिनी 'मेंगशान' रॉकेट; स्पेनने बंद केली अनेक विमानतळं

पृथ्वीच्या दिशेने वेगाने आदळणार चिनी ‘मेंगशान’ रॉकेट; स्पेनने बंद केली अनेक विमानतळं

Subscribe

चिनी रॉकेटच्या अयशस्वी प्रक्षेपणानंतर शास्त्रज्ञांनी हे रॉकेट पृथ्वीच्या दिशेने वेगाने सरकण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर स्पेनमधील अनेक विमानतळं बंद करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वैज्ञानिकांनी इशारा दिला की, एक अनियंत्रित 23 टन वजनाचं चिनी रॉकेट पृथ्वीच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. या रॉकेटचा ढिगारा केव्हाही पृथ्वीवर पडू शकतो, त्यामुळे अनेक देशांना याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या रॉकेटचा ढिगारा कोठे येऊन पडेल हे कोणालाच माहीत नाही, असे सांगितले जात आहे. (spain shuts its several airports airspace due to out of control chinese rocket falling back to earth)

मात्र रॉकेटचा ढिगारा युरोपच्या काही भागांवर उडून शकतो अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर युरोपातील देश सतर्क झाले आहेत. या भागात खबरदारी म्हणून स्पेनने अनेक विमानतळांवरील उड्डाणे पूर्णपणे बंद केली.

- Advertisement -

spain shuts its several airports airspace due to out of control chinese rocket falling back to earth

मेंगशान हे चिनी रॉकेट सोमवारी दुपारी दक्षिण द्विपीय प्रांतातील हेनानमधील वेनचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून पाठवण्यात आले. या रॉकेटला स्पेस स्टेशनवर पोहोचण्यासाठी 13 तास लागले असतील असा दावा चिनी शास्त्रज्ञांनी केला आहे. मेंगशानचे वजन सुमारे 23 टन, उंची 58.7 फूट आणि जाडी 13.8 फूट आहे.

- Advertisement -

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, हे रॉकेट 5 नोव्हेंबरला वातावरणीय बदलामुळे खाली कोसळले. पण या रॉकेटचा ढिगारा पृथ्वीवर कुठेही फुटून पडू शकतो. चीनचे रॉकेट अनियंत्रित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी या वर्षी जुलैमध्येही चीनचे रॉकेट प्रक्षेपित झाल्यानंतर पृथ्वीवर परत आले होते. त्यानंतर या चिनी रॉकेट लाँग मार्च 5B चा अवशेष मलेशिया आणि आसपासच्या देशांमध्ये पडला होता.


हेही वाचा : गुजरात की दिल्ली? आप कुठे लक्ष देणार? अरविंद केजरीवाल संभ्रमात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -