घरCORONA UPDATECoronavirus: स्पेनच्या उपपंतप्रधानांना करोनाची लागण

Coronavirus: स्पेनच्या उपपंतप्रधानांना करोनाची लागण

Subscribe

याबाबतची माहिती स्पेनच्या सरकारने बुधवारी दिली आहे.

करोना विषाणुने जगभर हातपाय पसरले आहे. चीन, इटलीनंतर आता करोनाने स्पेनमध्ये थैमान घातले आहे. स्पेनमधून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. स्पेनच्या स्पेनच्या उपपंतप्रधान कारमेन कॅल्वो यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती स्पेनच्या सरकारने बुधवारी दिली आहे. कारमेन कॅल्वो यांची मंगळवारी करोनाची चाचणी करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली. मात्र, पुन्हा एकदा चाचणी केली असता करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. स्पेनमध्ये आतापर्यंत करोनाचे ४७ हजार ६१० रुग्ण आढळले आहेत. तर ३ हजार ४३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -