आजपासून देशात मोफत बुस्टर डोस देण्यास सुरुवात, सर्व प्रौढांना 75 दिवसांत मिळणार लस

कोरोना संक्रमणामुळे होणारे मृत्यू तसेच गंभीर लक्षणं रोखण्यासाठी कोरोनाविरोधी लसीने महत्त्वाची भूमिका निभावली आहे

special vaccination campaign for booster dose of covid19 vaccine in india start today occasion of azadi ka amrit mahotsav

देशात कोरोना महामारीचा उद्रेक अद्याप संपण्याचे नाव घेत नाही, दररोज 15 हजार नवीन प्रकरणे समोर येत असून हा आकडा दिवसेंदिवस अधिक वाढतोय. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे,

केंद्र सरकारने शुक्रवारी देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत बुस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे. 15 जुलैपासून देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. याच दिवसापासून पुढील 75 दिवस नागरिकांना मोफत बुस्टर डोस देण्याची मोहिम सुरु ठेवली जाईल. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेणात आला. सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर वयस्कर नागरिकांना हा मोफत बुस्टर डोस मिळणार आहे.

कोरोना संक्रमणामुळे होणारे मृत्यू तसेच गंभीर लक्षणं रोखण्यासाठी कोरोनाविरोधी लसीने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. यामुळे आरोग्य मंत्रालयाने लसीच्या दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 6 महिन्यांवर आणले आहे. यासोबतच केंद्राने प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी हर घर दस्तक नावाची मोहिम सुरु केली. दरम्यान 18 वर्षावरील व्यक्ती आता कोरोनाविरोधी लसीचा बुस्टर डोस कोणत्याही सरकारी लसीकरण केंद्रावर जाऊन घेऊ शकणार आहे.

हेही वाचा : देशात केरळमध्ये सापडला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण

केंद्र सरकारची मोफक बुस्टर डोस मोहिम केवळ 75 दिवस चालवली जाणार आहे. त्यामुळे बुस्टर डोससाठी नागरिकांना सर्वात आधी कोविड पोर्टलवर बुकिंग करावे लागणार आहे. बुकिंगशिवाय देखील लस मिळेल. लसीकरण केंद्रावर जाऊन थेट लस घेता येते.

सरकारी हॉस्पीटलमध्येच फक्त मोफत कोरोनाविरोधी लसीचा बुस्टर डोस मिळणार आहे. मात्र खासगी रुग्णालयातून कोणास लस घ्यायची झाल्यास नागरिकांना पैसे मोजावे लागतील, खासगी लसीकरण केंद्रांवर कोविशील्ड आणि कोवॅक्सीनच्या बूस्टर डोससाठी 225 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. याशिवाय रुग्णालय स्वतंत्रपणे सेवा शुल्क देखील आकारू शकते.


शेतकऱ्यांना आंदोलनजीवी कोणी म्हटलं होतं? असंसदीय शब्दांच्या यादीवरून प्रियंका गांधी संतापल्या