घरदेश-विदेशनक्षलवाद्यांविरुद्ध कारवाईला वेग, मुख्य कमांडर टार्गेटवर!

नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाईला वेग, मुख्य कमांडर टार्गेटवर!

Subscribe

छत्तीसगडच्या विजापूरमध्ये ज्याप्रकारे नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला त्या नक्षलवाद्यांविरूद्ध आता मोठी मोहीम तयार केली गेली आहे. या मोहिमेत नक्षलवाद्यांच्या प्रमुख कमांडरांचा खात्मा करण्याची तयारी केली गेली आहे. आढावा बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईला वेग देण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी ह्यूमन इंटेलिजेंस आणि टेक्निकल इंटेलिजेंसची मदत घेतली जाईल. एवढेच नव्हे तर एनटीआरओ रिअल टाईम माहिती देऊन सुरक्षा यंत्रणांना मदत करेल. मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी कमांडरची यादी बनवून सुरक्षा संस्था लवकरच त्यांच्याविरूद्ध मोठी कारवाई सुरू करणार आहे.

ऑपरेशन प्रहार-3 अंतर्गत निर्दोष तरुणांचे ब्रेनवॉश करणारे आणि नक्षलवादी कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या बड्या नक्षलवाद्यांना लक्ष्य करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. सुरक्षा दलांनी पीएलजीए -1 चा सर्वोच्च कमांडर हिडमा याच्यासह नक्षलवाद्यांचे सर्वोच्च कमांडर यांची यादी तयार केली आहे. ज्यांच्यावर कारवाईसाठी आता कारवाईला वेग आला आहे. शनिवारी छत्तीसगडच्या विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत २४ सैनिक शहीद झाले आहेत. याशिवाय या चकमकीत 31 सैनिक जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये कोब्रा बटालियन, डीआरजी, एसटीएफ आणि बस्तरिया बटालियनचे जवान समाविष्ट आहेत.

- Advertisement -

नक्षलवाद्यांविरोधात कारवाई तीव्र करणार -अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी छत्तीसगडमधील जगदलपूरला पोहोचले. ‘आदिवासी भागातील विकासकामे वेगवान करून नक्षलवाद्यांविरूद्ध कारवाई जलदगतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, केंद्र आणि छत्तीसगड सरकार एकत्रितपणे नक्षल समस्येवर लढा देत आहेत. लढा अखेरपर्यंत नेण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत. ‘आम्ही लढा आणखी तीव्र करू आणि विजय मिळवू’, असे शहा म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -