घरदेश-विदेशमाझी प्रतिमा बिघडवण्यासाठी हजारो कोटी खर्च केले, राहुल गांधी यांचे भाजपावर टीकास्त्र

माझी प्रतिमा बिघडवण्यासाठी हजारो कोटी खर्च केले, राहुल गांधी यांचे भाजपावर टीकास्त्र

Subscribe

नवी दिल्ली : माझी प्रतिमा बिघडवण्यासाठी भाजपाने हजारो कोटी रुपये खर्च केले. प्रसार माध्यमे, सोशल मीडिया तसेच इतर साधनांचा वापर केला. मी काहीही बोललो नाही. शांत राहिलो. मी फक्त पाहिले की, यांच्यात किती ताकद आहे. पण आता एका महिन्यात मी सत्य काय आहे, ते दाखविले. सत्य लपविता येत नाही, असे जोरदार टीकास्त्र काँग्रेसचे नते राहुल गांधी यांनी शनिवारी केले.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शनिवारी (24 डिसेंबर 2022) राजधानी दिल्लीत पोहोचली. सकाळी राहुल गांधींनी दिल्लीच्या बदरपूर सीमेवरून प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर सोनिया गांधी आणि प्रियांका गांधीही या देखील यात्रेत सहभागी झाल्या. तर, आयटीओजवळ प्रसिद्ध सिनेअभिनेते कमल हसनही राहुल गांधी यांच्या या या यात्रेत सामील झाले. याशिवाय जयराम रमेश, पवन खेडा, भूपिंदरसिंग हुडा, कुमारी सेलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेतेही या यात्रेत सहभागी झाले.

- Advertisement -

ही यात्रा लाल किल्ल्याजवळ पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्यांना संबोधित केले. भाजपाने धर्माचा मुद्दा उपस्थित केला आहे. ते धर्माबद्दल बोलतात. पण गरीबांना चिरडले पाहिजे, मारले पाहिजे, असे हिंदू धर्मात कुठे लिहिले आहे. मी गीता, उपनिषद वाचले आहे, पण त्यात कोठेही असे म्हटलेले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

या भारत जोडो यात्रेदरम्यान तुम्हाला थंडी वाजत नाही का? असा प्रश्न काही पत्रकारांनी मला विचारला. तेव्हा, तुम्ही शेतकरी, कष्टकरी, मजूर यांनी हा प्रश्न विचारत नाही का? असा प्रतिसवाल मी त्यांना केल्याचे राहुल गाधी म्हणाले. केंद्र सरकार अब्जाधीशांसाठी काम करत असल्याचा आरोप करत ते म्हणाले, भारताचे पंतप्रधानांनाही कंट्रोल केले जात आहे. विमानतळ, बंदर, कृषीमालाची गोदामे, लाल किल्ला, मोबाईल, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या व उपक्रम त्यांच्या मालकीचे आहेत. ताजमहालही निघून जाईल. पण सत्य आमचे आहे, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

भारत जोडो यात्रेला 108 दिवस झाले आहेत. आता आज, शनिवारपासून 2 जानेवारीपर्यंत भारत जोडो यात्रेला विश्रांती असेल. यानंतर 3 जानेवारीला यात्रा पुन्हा सुरू होईल, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -