घरट्रेंडिंगमहिलेचे शरीर कशाप्रकारे शुक्राणू स्विकारतात ? संशोधनातून आले समोर

महिलेचे शरीर कशाप्रकारे शुक्राणू स्विकारतात ? संशोधनातून आले समोर

Subscribe

कोणत्याही महिलेसाठी आई होणं हे खूप आनंदी भावना असते. मात्र गर्भधारणा होणं ही काही सोपी प्रक्रिया नसते. कोणतीही महिला पुरुषाच्या स्पर्म अर्थात शुक्राणूशिवाय गर्भवती होऊ शकत नाही,नवीन अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की गर्भधारणेच्या थेट भूमिकेशिवाय शुक्राणू एक महत्त्वपूर्ण काम करतो. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडलेड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांकडून हा अभ्यास करण्यात आला आहे. हा अभ्यास नेचर रिसर्च जर्नल कम्युनिकेशन्स बायोलॉजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. अभ्यासानुसार, शुक्राणू केवळ स्त्रीला गरोदर राहण्यासाठी तयार करतो. शुक्राणू महिलेच्या प्रजनन उतींना एक असा संकेत देतो, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. य़ा संशोधनाच्या मुख्य लेखक प्रा. सारा रॉबर्टसन यांनी असे सांगितले की, हे पहिले संशोधन आहे की, जे असे स्पष्ट करते की महिलांची इम्यून रिस्पॉन्स शुक्राणूपासून मिळणाऱ्या सिग्नलवर काम करते. तसेच एग फर्टिलाईज करण्यास परवानगी देते. ज्यामुळे महिलेला गर्भधारणा होते.

प्रा.रॉबर्टसन म्हणाले, आतापर्यंत आम्ही शुक्राणूंच्या शक्तीचा विचार करत होतो. मात्र, नवीन संशोधनातून त्याच्या उलट माहिती समोर आली आहे. शुक्राणूंमध्ये फक्त जेनेटिक मटेरिअल नाही, तर महिलेच्या शरिराला समजाविण्याचे कामही शुक्राणू करतात. प्रजनन क्षमता वाढविण्याचे काम शुक्राणू करतो. शुक्राणूंमध्ये असणारे प्रोटिन्स गर्भधारणेच्या वेळी महिलेच्या प्रतिकार शक्तीला नियंत्रित करतात. जेणेकरून महिलेचे शरीर बाहेरील शुक्राणूंचा तिच्या शरीरात स्वीकार करू शकेल. शुक्राणू या प्रतिक्रियेला प्रभावित करतो की नाही ते अद्याप समोर आलेले नाही.

- Advertisement -

संशोधकांनी ग्लोबल जीनला समजण्यासाठी उंदराच्या मुत्राशयावर प्रयोग करून पाहिला, यासाठी पूर्णपणे शक्तीशाली आणि काही नसबंदीवाले शुक्राणू उंदराच्या मुत्राशयात सोडले. शुक्राणुंमुळे मादा उंदराच्या जीनमध्ये जास्त बदल झालेले दिसून आले. विशेषतः प्रतिकारशक्तीच्या प्रतिक्रियेमध्ये हा बदल जाणवला. या संशोधनानुसार नसबंदी केलेल्या पुरुषांच्या तुलनेत नसबंदी न केलेल्या पुरुषांच्या शुक्राणुंमुळे महिलांना चांगली रोगप्रतिकारक सहनशीलता मिळते. त्यामुळे महिलांच्या पेशीमध्ये शु्क्राणुंच्या थेट परिणाम जाणवतो. या नव्या संशोधनानुसार शुक्राणूंचा गर्भधारणेवर परिणाम जाणवतो. हे केवळ गर्भधारणेसाठी नाही तर बालकाच्या आरोग्यासाठीदेखील महत्वाचे आहे. वय, आहार, वजन, दारू आणि धुम्रपानसारख्या व्यसनांमुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होतो. यामुळे महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर तिचे आरोग्य देखील प्रभावित होऊ शकते.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -