खुशखबर! Spice Jet च्या वैमानिकांना मिळणार वेतनवाढ

Spicejet

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीचा कहर सुरू आहे. कोरोनाचा परिणाम हवाई प्रवास आणि विमान कंपन्यांना तितकाच झाला जितका इतर कंपन्या आणि क्षेत्रावर झाला. कोरोनादरम्यान, वैमानिकांच्या पगारात सतत कपात केल्यामुळे त्यांना तणावाचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले गेले. वैमानिकांनी दावा केला की, त्यांना त्यांच्या कोरोना पूर्वीच्या पगाराच्या फक्त एक तृतीयांश किंवा अर्धे वेतन दिले जात आहे. मात्र परवडणारी विमान कंपनी स्पाइसजेटने रविवारी सांगितले की, त्यांनी कॅप्टन आणि सहाय्यक कॅप्टनसाठी नवीन अंतरिम निश्चित वेतन प्रणाली आणली आहे. यामुळे केवळ वैमानिकाचा पगारच वाढणार नाही तर निर्धारित वेळेपेक्षा जास्त उड्डाण करणाऱ्यांनाही ओव्हरटाईम देण्यात येणार आहे. स्पाईसजेटने कोरोना महामारीच्या काळात वैमानिकांसाठी प्रति तासावर आधारित वेतन प्रणाली लागू केली होती.

इतर अनेक विमानसेवा आणि कंपन्यांनी कोरोना महामारी काळात कर्मचाऱ्यांशी करार संपवले, परंतु स्पाइसजेटमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले नाही. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सामान्य वेतन संरचना पुनर्संचयित करण्यास विलंब झाला, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सरकारने देशांतर्गत मार्गांवर विमान सेवा पुन्हा सुरू केली आहे, परंतु आजपर्यंत कोरोना महामारीच्या पूर्वीप्रमाणे १०० टक्के मार्गांवर उड्डाण सुरू झालेले नाही. पूर्ण क्षमतेने विमान सेवा सुरू न केल्यामुळे त्यांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे विमान कंपन्यांनी सांगितले.

देशांतर्गत विमान वाहतूक कंपनी स्पाईस जेट वेगाने आपल्या विमानांचे मार्ग वाढवत आहे. स्पाइसजेटने मुंबई आणि उदयपूर सारख्या देशांतर्गत मार्गांना जोडणारी ३८ नवीन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानं सुरू केली. कंपनीच्या मते, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि लहान शहरांना देशाच्या एव्हिएशन मॅपवर आणणे ही कंपनीची प्राथमिकता आहे. म्हणूनच स्पाइसजेट ३८ नवीन विमानं सुरू केल्याचे सांगितले आहे.


ईडी हे भाजपचं उपकार्यालय; अडसूळ यांच्यावरील कारवाईनंतर अरविंद सावंत यांचा हल्लाबोल