Corona in India: बाधितांची संख्या ५५ लाखांपार! दिवसात ७५,०८३ नव्या रूग्णांची नोंद

दिलासादायक बाब म्हणजे ४४ लाख ९७ हजारांहून अधिकांनी केली कोरोनावर मात

corona virus in india

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम वाढतच आहे. मंगळवारी देशात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या ५५ लाखांपार गेल्याचे समोर आले आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची लागण झालेल्या ७५ हजार ०८३ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर या काळात १ हजार ५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत ५५ लाख ६२ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशात सध्या बाधितांचा एकूण आकडा हा ५५ लाख ६२ हजार ६६४ असा असून त्यापैकी देशात ९ लाख ७५ हजार ८६१ इतके अॅक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे ४४ लाख ९७ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशात एकूण ८८ हजार ९३५ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

दरम्यान देशात कोरोनाचा कहर वाढत असताना कोरोना चाचण्यांची संख्याही वाढताना दिसतेय. दिवसभरात ९ लाख ३३ हजारांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती ICMR कडून देण्यात आली आहे .देशात आतापर्यंत एकूण ६,५३,२५,७९९ जणांनी आपल्या कोरोनाच्या चाचण्यांना केल्याचे सांगितले जात आहे.


आज आहे World Rose Day, पण का साजरा करतात हा दिवस? वाचा