घरदेश-विदेशमेरी कोम आणि राज्यवर्धन राठोड यांच्यात रंगला बॉक्सिंगचा सामना

मेरी कोम आणि राज्यवर्धन राठोड यांच्यात रंगला बॉक्सिंगचा सामना

Subscribe

येत्या १५ ते २४ नोव्हेंबरला दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडिअमवर जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये सहव्या वेळा गोल्ड मेडल जिंकण्यासाठी मेरी कोम उतरणार आहे.

भारताची बॉक्सर मेरी कोम आणि केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्यामध्ये बॉक्सिंगचा सामना रंगला. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेरि कोमने हा व्हिडिओ स्वत: ट्विटरवर पोस्ट केला आहे. जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं दुसऱ्यांदा भारातामध्ये आयोजन करण्यात आले आहे. येत्या १५ ते २४ नोव्हेंबरला दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडिअमवर जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये सहव्या वेळा गोल्ड मेडल जिंकण्यासाठी मेरी कोम उतरणार आहे. यावेळी मेरी कोमला या १० व्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे ब्रॅण्ड एम्बॅसिडर बनवण्यात आले आहे.

- Advertisement -

पाच वेळा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन असलेल्या मेरी कोम दुसऱ्यांदा आपल्या घरामध्ये मेडल जिंकण्यासाठी सहभागी आहे. यासाठी मेरी कोमने जोरदार तयारी सुरु केली आहे. दिल्लीमध्ये येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेची जोरदार तयारी सुरु आहे. खेळाडूंची सराव सुरु आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड इंदिरा गांधी स्टेडिअममधील रिंगपर्यंत पोहचले. यावेळी मेरी कोम आणि राज्यवर्धनसिंग राठोड यांच्यामध्ये एक मैत्रिपूर्व सामना रंगाला.

- Advertisement -

मेरि कोमने तिच्या ट्विटर अकाऊंटवर या सामन्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर तिने असे म्हटले आहे की, ‘बघितल्यावर विश्वस बसेल. सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी माननीय क्रीडा मंत्र्यांचे आभार’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -