Sputnik Light ने आणला कोरोनाविरोधी सिंगल डोस, लस ८० टक्के प्रभावी

All common people will get Sputnik V vaccine on 20 June, know the price
सर्व सामान्यांना 'या' दिवशी मिळणार Sputnik V लस, जाणून घ्या किंमत

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी गेल्या वर्षी रशियाने जगातील पहिली कोरोना लस विकसित केल्याचा दावा केला. ११ ऑगस्ट २०२० रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कोरोनावरील जगातील पहिली लस ‘स्पुटनिक व्ही’ तयार केल्याची घोषणा केली. त्यानंतर आता स्पुटनिक कंपनीने कोरोना लसीचा एक नवा डोस विकसित केला असून तो ८० टक्के प्रभावी असल्याचा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्पुटनिक व्हीने ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.

स्पुटनिक व्हीने अधिकृत ट्वीटमध्ये लिहिले आहे की, स्पुटनिक कुटुंबात एक नवा सदस्य आला आहे. स्पुटनिक लाईट असे या लसीचे नाव आहे. या लसीचा एक डोस ८० टक्के प्रभावी असून दोन डोस घेणाऱ्या लसींपेक्षा जास्त असरदार आहे.

रशियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पुटनिक व्हीच्या कोरोना लसीच्या सिंगल डोस स्पुटनिक लाईटला वापरासाठी मंजूरी दिली आहे. स्पुटनिक व्हीच्या ट्वीटरवर सांगितले की, ‘स्पुटनिक लाईटचा वापर करून लसीकरण वेगाने केले जाऊ शकते आणि यामुळे कोरोना पीक नियंत्रित आणण्यास मदत होईल. अर्थात स्पुटनिक व्ही ही लस मुख्य असेल, परंतु स्पुटनिक लाईट देखील विशेष असेल.’ ट्वीटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, ‘स्पुटनिक व्ही लसीला ६४ देशांमध्ये वापरासाठी मंजूरी मिळाली आहे. ज्यांनी एकूण लोकसंख्या ३.२ बिलियनहून अधिक आहे.’ तसेच पुढे सांगितले की, ‘स्पुटनिक लाईट ही वेगाने महामारीसोबत लढण्यासाठी एक विश्वसनीय लस आहे.’