Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश रशियन Sputnik-v देशातील ५० शहरांत उपलब्ध, तुमच्या शहरात मिळतेय?

रशियन Sputnik-v देशातील ५० शहरांत उपलब्ध, तुमच्या शहरात मिळतेय?

Related Story

- Advertisement -

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने कहर केले असून कोरोनाचा कहर अद्याप संपलेला नाही. कोरोना महामारीची दुसरी लाट आता मंदावली आहे. कोरोनाची दुसरी लाट मंदावली असताना, लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या मागणीला पुन्हा एकदा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. स्वदेशी उत्पादित कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड यांच्याबरोबरच सरकारने रशियन लस स्पुतनिक व्ही वापरण्यासही मान्यता दिली होती. स्पुतनिक व्ही लस १४ मे रोजी देशात सुरू करण्यात आली.

ही लस लाँच झाल्यापासून आतापर्यंत स्पुतनिक लस देशातील साधारण ५० शहरांमध्ये नागरिकांना देण्यात येत आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, जे स्पुतनिक व्ही ची निर्मिती करतात त्यांनी एक निवेदन जारी केले आहे. देशात या लसीच्या वापरास सुरूवात झाल्यापासून, स्पुतनिकचा डोस देशातील सुमारे ५० शहरांमध्ये दिला जात आहे. सॉफ्ट लॉन्चिंगपासून आत्तापर्यंत आम्ही रोल आउटसाठी बरीच मोठ्या हॉस्पिटलशी करार केला असल्याचे सांगितले जात आहे.  दरम्यान, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले की, येत्या काही आठवड्यांत आम्ही स्पुतनिक व्ही च्या कॉमर्शियल रोल आउटला आणखी बळकटी देऊ. या शक्यतांना नकार देत कंपनीने म्हटले आहे की, आम्ही देशात स्पुतनिक व्ही लसचा प्रचार करण्याचे काम थांबवले नाही, तसेच लस सुरू करण्याचे थांबवले नाही. विशेष म्हणजे स्पुतनिक लस १४ मे रोजी देशात नागरिकांना देणं सुरू झाले आणि कमी वेळात देशात ५० शहरांमध्ये आज ही लस नागरिकांना दिली जात आहे.

- Advertisement -

भारतात सध्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत अॅस्ट्राझेनिका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेली कोविशिल्ड ही लस दिली जात आहे. तर हैदराबादच्या भारत बायोटेकने विकसित केलेली कोवॅक्सिनही लसीकरण मोहिमेत नागरिकांना दिली जात आहे. परंतु स्पूतनिक ही तिसरी लस भारतात दाखल झाल्याने लसीकरण मोहिम अधिक वेगाने सुरू आहे. नागरिकांना या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. पहिला डोस घेतल्यानंतर २१ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर २८ आणि ४२ दिवसांमध्ये शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असणार आहे. ‘स्पुटनिक V ‘ चे लसीकरण सुरु झाल्यानंतर रशिया सरकारने आपल्या नागरिकांना दोन महिने दारुचे सेवन न करण्याचा सल्ला दिलाय.


- Advertisement -