Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश दिलासादायक! रशियाची Sputnik V कोरोना लस ठरली ९२ टक्के परिणामकारक

दिलासादायक! रशियाची Sputnik V कोरोना लस ठरली ९२ टक्के परिणामकारक

या लशीच्या चाचणीचे निकाल हाती आले असल्याचे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने सांगितले

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप सुरू असून कोरोनावरील लस कधी येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाट येणार अशी देखील चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियाचे स्पुतनिक V लस कोरोनापासून बचावासाठी ९२ टक्के परिणामकारक ठरल्याचे या देशाने सांगितले आहे. या लशीच्या चाचणीचे निकाल हाती आले असल्याचे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने सांगितले आहे. याच संस्थेतर्फे कोरोना लशीचे जगभरात मार्केटिंग होत असल्याची देखील माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या लशीला ११ ऑगस्ट रोजी मंजुरी देण्यात आली आणि यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला. रशियाने Sputnik V ची १६ हजार लोकांवर चाचणी केली. या लोकांना लशीचे दोन दोन डोस देण्यात आले होते. एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित असलेली ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आली होती.

- Advertisement -

रशियन वृत्तसंस्था TASS च्या मते, रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार असून इतर देशांसाठी याची किंमत किती असेल याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, भारतातही Sputinik V लशीच्या चाचण्या सुरू झाल्या होत्या. मात्र या लशीच्या क्लिनिकल ट्रायलया शेवटचा टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही, त्यामुळे लशीच्या सुरक्षिततेबाबत जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, अमेरिकेतील फायझर या औषध कंपनीने दावा केला आहे की, कोरोनावरील लस ९० टक्के प्रभावी असून फायझर आणि जर्मन बायोटेक्नॉलॉजी फर्म BioTech यांनी विकसित केलेली कोरोना व्हायरस लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे.


Pfizer कंपनीचा दावा; ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी Corona लस
- Advertisement -