घरदेश-विदेशभारतातील कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवरील इतर लसींपेक्षा Sputnik V अधिक प्रभावी, कंपनीचा दावा

भारतातील कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवरील इतर लसींपेक्षा Sputnik V अधिक प्रभावी, कंपनीचा दावा

Subscribe

रशियन लस उत्पादक कंपनीने स्पुटनिक व्ही भारतात आढळलेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध कोणत्याही इतर लसीपेक्षा अधिक प्रभावी आहे, असा दावा रशियन लस उत्पादक स्पुटनिक व्ही कंपनी यांनी केला आहे. यासह कंपनीने असे म्हटले की, आतापर्यंत जेवढ्या लसींनी या स्ट्रेनच्या संदर्भात जे परिणाम सादर केले आहे, त्यापैकी सर्वोत्तम परिणाम स्पुटनिक व्ही या कोरोना लसींचे असल्याचे समोर आले आहे. गामालेआ सेंटरने कोरोनाव्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटवरील अनेक अभ्यास आंतरराष्ट्रीय आढावा जर्नलमध्ये प्रकाशित करण्यासाठी सादर केले आहे, असे सांगून स्पुटनिक व्ही यांनी हा दावा केला आहे.

भारतात स्पुटनिक व्ही या लसीला आपतकालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. आता २० जूनपासून ही लस सर्वसामान्यांना देण्यात येणार आहे. रविवारी अपोलो रुग्णालयातील १७० सदस्यांना ही लस देण्यात आली आहे. यापूर्वी ही लस फक्त डॉ. रेड्डी प्रयोगशाळांच्या कर्मचार्‍यांना दिली जात होती.

- Advertisement -

अशी असणार Sputnik V लसीची किंमत

केंद्र सरकारच्या नवीनतम मूल्य निर्धारणाच्या नियमांनुसार, Sputnik V लसीची किंमत १ हजार १४५ रुपये असणार आहे. ज्यात रुग्णालयाचे शुल्क आणि कराचा समावेश असणार आहे. याआधीही अपोलो रुग्णालयात लसी देण्यात आल्या. त्या लसींच्या एका डोसची किंमत १ हजार २५० रुपये इतकी होती. पुढील काळात लसींच्या किंमती कमी केल्या जातील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

अपोलो रुग्णालयासोबतच मधुकर रेनबो चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्येही Sputnik Vलस उपलब्ध होणार आहे. Sputnik V लस घेण्यासाठी नागरिकांना पहिल्यांदा कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. Sputnik Vलसीला देशात आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर भारतात डॉ. रेड्डीज लॅबरोटेरिज Sputnik Vलसीचे उत्पादन करत आहे. हैद्राबाद आणि विशाकापट्टणम येथील प्लॅटमध्ये ही लस तयार करण्यात येत आहे.


Covaxin सरकारला १५० रूपयात दीर्घकाळ देणे भारत बायोटेकला अशक्य

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -