घरताज्या घडामोडीSputnik V येत्या चार ते सहा आठवड्यात भारतात तयार होणार

Sputnik V येत्या चार ते सहा आठवड्यात भारतात तयार होणार

Subscribe

येत्या चार ते सहा आठवड्यात Sputnik V च्या कर्मशिअल निर्मितीसाठी सुरूवात होणार असल्याचे स्पुटनिकमार्फत ट्विट करून सांगण्यात आले आहे. भारतामध्ये स्पुटनिकची निर्मिती RDIF च्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील सुरी यांनी स्पष्ट केले आहे. मॉरपेन लॅबरेटरीजच्या माध्यमातून ९७ टक्के वाढ झाल्याचे सांगतानाच नफा झाल्याची माहिती जाहीर करण्यात आली. महत्वाचे म्हणजे तिमाही सत्रात कोरोनामुळे अनेक आव्हाने असतानाही कंपनीला चांगली कामगिरी करता आल्याची माहिती देण्यात आली आहे.

रशियन डायरेक्ट इनवेस्टमेंट फंड (RDIF) आणि मॉरपेन लॅबोरटरीजच्या माध्यमातून कोरोनाविरोधी स्पुटनिक लसीच्या निर्मिती हिमाचल प्रदेश इथे सुरू आहे. त्यापैकी पहिल्या सहा खेपा या मॉस्कोच्या गॅमेलिया येथे गुणवत्ता चाचणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. येत्या चार ते सहा आठवड्यांमध्ये आम्ही लशीची निर्मितीला भारतात सुरूवात करू शकतो. भारतात लस निर्मितीसाठी आरडीआयएफसोबतची पार्टनरशीप ही कंपनीसाठी अतिशय महत्वाची अशी गोष्ट असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. सध्या कंपनीकडे वर्षापोटी २५ कोटी लसीचे डोस निर्माण करण्याची क्षमता आहे. येत्या वर्षभरात ही क्षमता वर्षापोटी ५० कोटीपर्यंत वाढवता येऊ शकते. देशात जलद पद्धतीने लसीकरण करण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. हिमाचल प्रदेश येथे बड्डी येथे १० प्लॅन्ट्समध्ये ही लस निर्मिती केली जाणार आहे.

- Advertisement -

केरळ सरकारचाही करार

केरळ सरकार आणि RDIF च्या माध्यमातून एक करार करण्याच्या मार्गावर आहे. यासाठीचा प्रस्तावही केरळ सरकारकडून आरडीआयएफला सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावानुसार लाईफ सायन्स पार्कमध्ये एक ग्रीनफिल्डचा प्रकल्प आहे. तर दुसऱ्या प्रकल्पाअंतर्गत दीर्घकालीन प्रकल्पाचा समावेश आहे. त्यामध्ये केएसडीपीएल महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. लस तयार झाल्यानंतर ही लस कुप्यांमध्ये भरणे यासारखी कामे याठिकाणी होणे अपेक्षित आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -