Sputnik vs Pfizer: ओमिक्रॉनविरोधात स्पुतनिक लस फायझरपेक्षाही अधिक प्रभावी; रिसर्च

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारतासह जगाची चिंता वाढवली आहे.अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा हा व्हेरिएंट अधिक वेगाने पसरतोय. परंतु एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, ओमिक्रॉनविरुद्ध रशियाची स्पुतनिक व्ही ही लस जर्मनीच्या फायझर लसीपेक्षाही अधिक प्रभावी आहे. इटलीच्या italian Spallanzani Institute संस्थेने केलेल्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.

Sputnik vs Pfizer: more effective against Omicron than Sputnik vaccine Pfizer; Research
Sputnik vs Pfizer: ओमिक्रॉनविरोधात स्पुतनिक लस फायझरपेक्षाही अधिक प्रभावी; रिसर्च

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारतासह जगाची चिंता वाढवली आहे.अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा हा व्हेरिएंट अधिक वेगाने पसरतोय. परंतु एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, ओमिक्रॉनविरुद्ध रशियाची स्पुतनिक व्ही ही लस जर्मनीच्या फायझर लसीपेक्षाही अधिक प्रभावी आहे. इटलीच्या italian Spallanzani Institute संस्थेने केलेल्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.

या अभ्यासानुसार, ओमिक्रॉनविरुद्ध स्पुतनिक व्हीचे दोन डोस फायझर लसीच्या दोन डोसच्या तुलनेत दुप्पट प्रभावी आहेत. gamaleya National Research Center of Epidemiology and Microbiology आणि Russian Direct Investment Fund (RDIF) यांनी गुरुवारी या अभ्यासाचा हवाला देत ही माहिती दिली.

Gamaleya चे Center Director अलेक्सांद्र गिंट्सबर्ग यांनी एका निवेदनात म्हटले की, Gamaleya Center आणि Spallanzani Institute यांच्या संयुक्त अभ्यासातून या डिसेंबर 2021 मध्ये स्वतंत्रपणे प्रकाशित झालेल्या आमच्या अभ्यासाची पुष्टी मागील अभ्यासाने केली आहे. वैज्ञानिक डेटाने हे सिद्ध केले आहे की, ओमिक्रॉनविरूद्ध स्पुतनिक व्ही लस इतर लसींपेक्षा अधिक प्रभावी आहे आणि या नव्या व्हेरिएंटविरोधात लढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. भारतात, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सरकारने Sputnik V लसीला आपत्कालीन वापरास परवानगी दिली.

या अभ्यासाचा दाखला देत, Gamaleya Center आणि RDIF ने सांगितले की, Sputnik Light मिसळल्याने ओमिक्रॉन विरुद्ध mRNA लसींची प्रभावीता वाढू शकते.एडिनोव्हायरल आणि mRNA लसींचे संयोजन ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपासून मजबूत संरक्षण प्रदान करू शकतात. Sputnik V ही लस Gamaleya National Research Center of Epidemiology and Microbiology आणि RDIF यांनी विकसित केली आहे.

हेही वाचा – मुंबईकरांवर पाणी संकट! उद्या ‘या’ भागात 24 तास पाणीपुरवठा बंद