घरदेश-विदेशश्रीलंकेत महागाईच्या झळा तीव्र, 'या' जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला!

श्रीलंकेत महागाईच्या झळा तीव्र, ‘या’ जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला!

Subscribe

दिवसेंदिवस गगणाला भिडणाऱ्या किंमतींमुळे नागरिकांना पोटाची खळगी भरणं कठीण झालयं. 67 लाखांहून अधिक नागरिकांना पुरेस अन्न नसल्याने उपासमार सहन करावी लागतेय

श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहे. या ठिकाणच्या महागाईने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या महागाईच्या संकटाने सर्व सामान्यांचे लचके मोडलेत. सततच्या महागाईमुळे येथील नागरिकांना रोजच्या जीवनावश्यक खरेदीसाठी मारामार करावी लागतेय. तर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांना तासांतास रांगेत उभे राहवं लागतय. भाज्या, फळं आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने नागरिकांना उपासमारीचे बळी पडत आहेत. अनेकांना दोन वेळचं खाणं देखील मिळत नाही.

श्रीलंकेत आता फळ, भाज्या खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेय, तर देशातील पदार्थांचा साठा देखील संपत चालला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ खरेदी करणे नागरिकांसाठी दिवसेंदिवस अवघड होतेय. दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. एक किलो सफरचंदासाठी नागरिकांना 1500 ते 1600 हजार मोजावे लागत आहेत, हाच भाव जानेवारीमध्ये 350 रुपये होता. तर पेरू पूर्वी 300 रुपये किमतींना मिळत होते त्यासाठी आता 600 रुपये मोजावे लागत आहेत. तर संत्र्यासाठी 1500, नारळासाठी 150 आणि स्ट्रॉबेरीसाठी 750 रुपये मोजावे लागत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : श्रीलंकेत आर्थिक संकट, मदतीसाठी ‘या’ देशांनी घेतला पुढाकार

श्रीलंकेतील परकीय चलन साठ्यात मोठी घट झाल्याने आता माल आयात करणे अवघड झालेय. परिणामी देशातील वस्तूंचा साठा संपण्याच्या वाटेवर आहे. यामुळे नागरिकांना रोजच्या वापरातील कॉर्नफ्लेक्ससाठी 500 रुपये, सॉससाठी 450 रुपये, न्यूट्रेला 4500 रुपये प्रतिकिलो, काजू 6 हजार रुपये किलो, लोणी 1300 रुपये किलो, चीज 1500 रुपये मोजावे लागत आहेत.

- Advertisement -

श्रीलंकेतील या आर्थिक संकटामुळे आता नागरिकांना अन्नासह, औषधे, स्वयंपाक गॅस, इंधन, टॉयलेट पेपर अशा अनेक रोजच्या वापरातील वस्तूंची टंचाई जाणवत आहे. इंधन, एटीएम आणि स्वयंपाक गॅस खरेदीसाठी नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागतेय. श्रीलंकेतील या भीषण आर्थिक संकटामुळे 63 लाख नागरिकांहून अधिक नागरिकांना अन्नाची भ्रांत आहे. यात दिवसेंदिस भर पडतेय. या परिस्थितीत वेळीच हस्तक्षेप केला नाही तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

हेही वाचा : श्रीलंकेत जनता महागाईने त्रस्त, पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलक कॅरम खेळण्यात व्यस्त

दिवसेंदिवस गगणाला भिडणाऱ्या किंमतींमुळे नागरिकांना पोटाची खळगी भरणं कठीण झालयं. 67 लाखांहून अधिक नागरिकांना पुरेस अन्न नसल्याने उपासमार सहन करावी लागतेय. तर काहींना अन्नचं मिळणं कठीण झाले. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने देखील या परिस्थितीवर चिंता व्यक्त केलीय.


तेलंगणातील ढगफुटीमागे परकीय षडयंत्र; मुख्यमंत्री केसीआर यांचा जावई शोध

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -