Sri Lanka economic crisis: श्रीलंकेत गेल्या 51 दिवसांपासून आंदोलन सुरुचं; आंदोलकांवर पोलिसांकडून अश्रू धुराचा मारा

या आंदोलनामुळे श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये तणावपूर्वक स्थिती निर्माण झाली आहे. आंदोलकांना शांत करता करता पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत.

Sri Lanka economic crisis protest continues for 50 days in sri lanka police fired tear gas shells at students
Sri Lanka economic crisis: श्रीलंकेत गेल्या 51 दिवसांपासून आंदोलन सुरुचं; आंदोलकांवर पोलिसांकडून अश्रू धुराचा मारा

श्रीलंकेत गेल्या अनेक दिवसांपासून भीषण आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत आता जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यामुळे श्रीलंकन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या नागरिकांकडून आता श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन अधिक तीव्र केले जात आहे. रविवारी हाजारोच्या संख्येने श्रीलंकन विद्यार्थिंनी राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन केले, या आंदोलकांना पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांकडून अश्रू धुराचा मारा करण्यात आला. तर दंगलविरोधी पथकाकडूनही यावेळी आंदोलकांवर पाण्याचा मारा करण्यात आला.

गेल्या 51 दिवसांपासून हजारोंच्या संख्येने श्रीलंकन महिला आणि पुरुष राजपक्षे यांच्या समुद्र किनारी लागू असलेल्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. स्वातंत्र्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक परिस्थितीचा सामना करत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.

तर दुसरीकडे श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी रविवारी नॅशनल टेलिव्हिजनवरून आंदोलकांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले, यावेळी विक्रमसिंघे यांनी 15 सामित्यांच्या योजनेची माहिती देत सांगितले की, या समित्या देशातील देशात स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी संसदेसह मिळून काम करेल. यासाठी युवा वर्ग आम्हाला बदल घडवण्यासाठी व्यवस्थेत मदत करेल. यासाठी 15 समित्यांमध्ये प्रत्येकी 4 युवा प्रतिनिधी नियुक्त करण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या आंदोलनामुळे श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये तणावपूर्वक स्थिती निर्माण झाली आहे. आंदोलकांना शांत करता करता पोलिसांच्या आता नाकी नऊ येत आहेत. दरम्यान अनेकांकडून आता पोलिसांनी टाकून दिलेले अश्रू धुरांचे गॅस कंटेनर पोलिसांच्या दिशेने फेकले जात आहेत. या आंदोलनात महिला चिकित्सा आणि विज्ञान विषयक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

सध्या श्रीलंकेत लोकांना पेट्रोलपासून अन्नपदार्थांपर्यंत सर्वच गोष्टींसाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया आणि त्यांच्या कुटुंबाकील इतर सदस्यांना पायउतार होण्यासाठी दबाव आणण्यासाठी लोक आंदोलन करत आहेत. 9 मे रोजी सरकार समर्थक आणि सरकारविरोधी निदर्शकांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. ज्यामध्ये 11 लोक ठार झाले तर 200 हून अधिक जखमी झाले.

खतांच्या पुरवठ्यासाठी 60 कोटी डॉलरची आवश्यक: पंतप्रधान

पंतप्रधान विक्रमसिंघे म्हणाले की, देशात खतांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 60 कोटी डॉलरची आवश्यकता आहे. कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विक्रमसिंघे यांच्यात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर बँकांनी डॉलर्स जारी केले तर कंपन्या खतांचा पुरवठा करण्यास तयार आहेत. यावर विक्रमसिंघे म्हणाले की, ते लवकरच संसदेत अत्यावश्यक कृषी पुरवठा विधेयक सादर करतील, जे अन्नपदार्थांचा अखंड पुरवठा सुनिश्चित करेल.

सध्या श्रीलंकेत 270 प्रकारच्या महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा आहे. दरम्यान, भारताने पाठवलेल्या 25 टन औषधांची खेप शुक्रवारी श्रीलंकेत पोहोचली. त्याची किंमत 26 कोटी आहे. कार्यवाहक भारतीय उच्चायुक्त विनोद के. जेकबने श्रीलंकेचे आरोग्य मंत्री केहेलिया रम्बुकवेला यांना वैद्यकीय साहित्याची खेप सुपूर्द केली.


Sidhu Moose Wala च्या मृत्यूच्या तारखेचं ‘या’ गाण्यांशी खास कनेक्शन? कसे ते वाचा