घरक्रीडाश्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगा यांना अटक

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगा यांना अटक

Subscribe

श्रीलंकेचे पेट्रोलियम मंत्री आणि माजी क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबार प्रकरणी रणतुंगा यांना अटक झाली आहे.

श्रीलंकेचे पेट्रोलियम मंत्री आणि माजी क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगा यांना सोमवार, २९ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीलंकेतील राजकारणात मोठी उलथापालट झाली आहे. या राज्याचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर येथील राजकीय वातावरण तापले. शिवाय काही ठिकाणी हिंसक घटनादेखील घडल्या आहेत. अर्जुना रणतुंगा हे रानिल विक्रमसिंघे यांचे निकटवर्तीय आणि सहकारी असून त्यांच्या सुरक्षा रक्षकांने केलेल्या गोळीबार प्रकरणी रणतुंगा यांना ही अटक झाली आहे.

- Advertisement -

काय आहे हे प्रकरण

रविवार, २८ ऑक्टोबर रोजी अर्जुना रणतुंगा आपल्या कार्यालयाकडे जात असताना त्यांची गाडी आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकाने आंदोलकांवर गोळीबार केला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. दरम्यान, कोलंबो क्राइम विभागाने सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबार प्रकरणी पेट्रोलियम मंत्री अर्जुना रणतुंगा यांना अटक केली असून याप्रकरणी त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे, असे पोलीस प्रवक्ते रुवान गुनासेखरा यांनी सांगितले.

पंतप्रधानपदावरून वादविवाद

गेल्या शुक्रवारी, २६ तारखेला राष्ट्रपती मैत्रीपाला श्रीसेना यांनी राजपक्षे यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली होती. मात्र संसदेच्या अध्यक्षांनी रानिल विक्रमसिंघे यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून मान्यता दिली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांची भेट घेत संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. आपल्याकडे बहुमत असल्याचाही दावाही विक्रमसिंघे यांनी केला होता. असे असूनही राष्ट्रपतींनी शनिवारी संसदेला १९ नोव्हेंबरपर्यंत संस्थगित ठेवले आहे. नवीन पंतप्रधान महिंद्रा राजपाक्षे यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, या उद्देशाने राष्ट्रपतींनी हा निर्णय घेतला. दुसरीकडे मी अजूनही देशाचा पंतप्रधान आहे, असा दावा विक्रमसिंघे यांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -