Eco friendly bappa Competition
घर क्रीडा श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा आयपीएलला मोठा फटका

श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा आयपीएलला मोठा फटका

Subscribe

श्रीलंका देश आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला समोरं जात आहे. मागील काही दिवसांपासून देशातील नागरिकांना इंधन आणि घरगुती गॅससाठी मोठ्या रांगांमध्ये उभे राहावं लागत आहे. अत्यावश्यक वस्तुंचाही तुटवडा निर्माण झाला आहे.

श्रीलंका देश आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला समोरं जात आहे. मागील काही दिवसांपासून देशातील नागरिकांना इंधन आणि घरगुती गॅससाठी मोठ्या रांगांमध्ये उभे राहावं लागत आहे. अत्यावश्यक वस्तुंचाही तुटवडा निर्माण झाला आहे. या आर्थिक संकटामुळं श्रीलंकेतील नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला असून, सर्वच क्षेत्रांना याचा फटला बसला आहे. अशातच आता प्रासरमाध्यम समुहांमधूनही लोकांना कामावरुन काढून टाकण्यात येत आहे. अनेक टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रांनी कर्मचारी कपात केली आहे. त्यामुळं याचा फटका आता थेट भारतात सुरू असलेल्या इंडियन प्रिमीयर लीगला (आयपीएल) बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेमधील दोन महत्वाच्या वृत्तपत्रांमधील आयपीएलचं वृत्तांकन पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. या वृत्तपत्रांमध्ये आता वेळ आर्थिक संकटासंदर्भातील वृत्तांकन केलं जात आहे. याचप्रमाणे अनेक स्पोर्ट्स चॅनेलने कर्मचारी कपात केल्यानं आयपीएलचं लाइव्ह टेलिकास्टही बंद करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी आवश्यक कर्मचारी संख्याच नसल्यानं आयपीएलच्या प्रसारणावर परिणाम झाल्याचं समजतं.

- Advertisement -

“देशातील अनेक क्रिकेटप्रेमींना आयपीएलचं थेट प्रक्षेपण हवं आहे. तसंच, स्थानिक चॅनेल्सलाही आयपीएलच्या सामन्यांचं प्रक्षेपण हवं आहे. मात्र सध्या देशात आर्थिक संकट असल्यामुळं आयपीएलचं थेट प्रक्षेपण थांबवावं लागलं आहे. काही आठड्यांपूर्वी सरकारनं शाळांमधील परीक्षाही पेपरचा तुटवडा असल्यानं रद्द करण्यात आल्यात”, असं स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं.

सामन्यांचं प्रक्षेपण रद्द झाल्यानं याचा परिणाम जाहिरातींवर आणि पर्यायानं चॅनेल तसंच आयपीएलच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने सध्या मुंबई इंडियन्सच्या संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम करतोय. देशातील परिस्थिती पाहून वाईट वाटत असल्याचं त्याने म्हटलं आहे. लोकांच्या गरजांकडे सरकार दुर्लक्ष करु शकत नाही असं सांगतानाच लोकांच्या हक्कांच्या संरक्षणाचं काम सरकारचं असल्यांच जयवर्धनने म्हटलं.


- Advertisement -

हेही वाचा – ICC ODI Ranking: हरमनप्रीत कौर चौदाव्या स्थानावर तरी फायद्यात; पण मिताली अन् मंधानाचं नुकसान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -