घरदेश-विदेशश्रीकांत त्यागीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, मेरठमधून केली अटक

श्रीकांत त्यागीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, मेरठमधून केली अटक

Subscribe

श्रीकांत त्यागीची कसून चौकशी केली जात आहे, फरार असताना त्याला कोणी आश्रय दिला याचीही माहिती मिळवली जात आहे. चौकशीदरम्यान काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्याआधारे पोलीस पुढील कारवाई करणार आहेत, असंही पोलीस आयुक्तांनी सांगितली

नवी दिल्ली : नोएडाच्या ग्रँड ओमॅक्स सोसायटीमध्ये एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी फरार असलेल्या श्रीकांत त्यागीला यूपी पोलिसांनी अटक केलीय. यानंतर त्याला सुरजपूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयानं मंगळवारी श्रीकांत त्यागीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

फरार आरोपी श्रीकांत त्यागी याला नोएडा येथील महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी मंगळवारी मेरठमध्ये पोलिसांनी अटक केली. गौतम बुद्ध नगरचे पोलीस आयुक्त आलोक सिंह यांनी सांगितले की, माहितीच्या आधारे नोएडा पोलिसांनी त्यागीला पहाटे मेरठ येथून अटक केली. त्यागी यांच्यासोबत उपस्थित असलेल्या अन्य चार जणांनाही अटक करण्यात आली आहे. श्रीकांत त्यागीची कसून चौकशी केली जात आहे, फरार असताना त्याला कोणी आश्रय दिला याचीही माहिती मिळवली जात आहे. चौकशीदरम्यान काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्याआधारे पोलीस पुढील कारवाई करणार आहेत, असंही पोलीस आयुक्तांनी सांगितली.

- Advertisement -

ज्या पोलीस पथकाने श्रीकांत त्यागीला अटक केली, त्याला आणि उत्तर प्रदेश सरकारकडून बक्षीस दिले जात आहे. यापूर्वी नोएडा पोलिसांनी त्यागीला फरार घोषित केले असून, त्याच्यावर २५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केलेय. त्यानंतर त्यागी याने गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील एका न्यायालयात आत्मसमर्पण करण्यासंबंधीची याचिका दाखल केली.


सेक्टर 93-बीमधील ग्रँड ओमॅक्स सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेने श्रीकांत त्यागीने सोसायटीमधील नियमांचे उल्लंघन करत काही झाडे लावल्याबद्दल आक्षेप घेतला होता, त्यानंतर त्यागीने महिलेशी असभ्य वर्तन केले आणि त्याला धक्काबुक्कीही करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सार्वजनिक झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचाः अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, उपसभापती नीलम गोर्‍हे यांची घोषणा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -