घरदेश-विदेशबारामुल्लामध्ये मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, 3 किलो IED जप्त

बारामुल्लामध्ये मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, 3 किलो IED जप्त

Subscribe

जम्मू काश्मीरमधील बारामुल्लामध्ये पुन्हा एकदा मोठा दहशवादी हल्ला घडवण्याचा कट आखण्यात आला होता. मात्र सुरक्षा दलांना वेळीच दहशवाद्यांनी पेरलेला आयडी सापडल्याने कट उधळून लावण्यात यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील तुलिबल बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी आयडी पेरला होता. याची माहिती सुरक्षा दलाला मिळताच सोपोर पोलीस, 52RR आणि CRPF चे जवान घटनास्थळी पोहोचले. तसेच बॉम्बशोधक पथकानेही घटनास्थळी पोहचत तो निकामी केला आहे.

बारामुल्लामधील हल्ल्याचा कट फसला

भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील तुलिबल भागात आज सकाळी 2-3 किलो वजनाचे स्फोटक उपकरण सापडले आहे. खोदकाम केलेल्या एका जागेत हा संशयित आयईडी लपवून ठेवण्यात आला होता. भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार, बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने स्फोटाच्या पद्धतीचा वापर करून आयईडी सुरक्षितपणे निकामी केला. यामुळे संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली होती. सुमारे दोन तास चाललेल्या ऑपरेशननंतर आयईडी निकामी करण्यात आला. यानंतर राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

- Advertisement -

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात रस्त्याच्या कडेला आयईडी स्फोटक पेरण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. सुरक्षा दलाच्या पथकाला सोपोरमधील तुलिबल येथे सकाळी दहशतवाद्यांनी पेरलेला हा आयईडी सापडला. दरम्यान आता संपूर्ण परिसरात सुरक्षा दलाकडून झाडाझडती घेतली जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.


भारत – चीन सीमावादाच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -