श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; एका पोलीस कर्मचारी शहीद, तर दोन जखमी

srinagar police naka party terror attack asi killed two jawan injured

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर शहरातील लालबाजार भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक पोलीस जवान शहीद झाला तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुश्ताक अहमद असे शहीद जवानाचे नाव आहे. दरम्यान परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या लाल बाजार परिसरातील जीडी गोयंका शाळेजवळ दहशतवाद्यांनी पोलीस नाका पार्टीवर गोळीबार केला. या हल्ल्यात एएसआय मुश्ताक अहमद यांचा जागीच मृत्यू झाला तर हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल अबू बकर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहशतवाद्यांच्या शोधासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

 


घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अमरनाथ यात्रेमुळे काश्मीरमध्ये हाय अलर्ट असताना हा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे.


वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होताच सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा