Homeदेश-विदेशSS UBT Vs BJP : दहा वर्षांत सीमा सुरक्षित का होऊ शकल्या...

SS UBT Vs BJP : दहा वर्षांत सीमा सुरक्षित का होऊ शकल्या नाहीत? ठाकरे गटाचा मोदी सरकारला सवाल

Subscribe

भारत हा सुरक्षेच्या दृष्टीने भाग्यवान नाही, हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे म्हणणे खरेच आहे आणि गेली दहा वर्षे सत्तेत असणारेही हे ‘दुर्भाग्य’ बदलू शकलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. फक्त त्याचे उत्तरदायित्व सध्याचा सत्तापक्ष स्वीकारणार का? हा खरा प्रश्न आहे.

(SS UBT Vs BJP) मुंबई : काँग्रेस राजवटींच्या परराष्ट्र धोरणावर तोंडसुख घेणारेच मागील दहा वर्षे सत्तेत आहेत. मग या दहा वर्षांत भारतीय सीमा सुरक्षित आणि संरक्षित का होऊ शकल्या नाहीत? शेजारी राष्ट्रांशी मोदी सरकारचे परस्परसंबंध खूप मैत्रीचे आहेत, असे भाजपावाले नेहमीच सांगत असतात, मग हे मैत्रीपूर्ण संबंध सीमांवरील तणाव का कमी करू शकलेले नाहीत? साबरमती नदीच्या किनाऱ्यावर झोपाळ्यावर बसून चिनी राष्ट्राध्यक्षांनी ढोकला-जिलेबी खाल्ली म्हणून चीनचे भारताविषयीचे धोरण ‘केम छो’ का झाले नाही? असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे. (Thackeray group criticizes Modi government on Indian border security)

सीमा सुरक्षेबाबत भारत भाग्यवान नाही. सीमांवर आपल्याला सातत्याने आव्हानांना तोंड द्यावे लागते, असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे. मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी जवानांना संबोधताना राजनाथ सिंह यांनी सीमा सुरक्षेसंदर्भात हे महत्त्वाचे वक्तव्य केले. संरक्षणमंत्री बोलले ते खरेच आहे. प्रश्न इतकाच की, मग मोदी राजवटीच्या यशस्वी वगैरे परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाच्या ज्या पिपाण्या गेली दहा-अकरा वर्षे वाजविल्या जात आहेत, त्याचे काय? या सर्व पुंग्या गाजराच्याच निघाल्या आणि शेजारी राष्ट्रांनी त्या मोडून खाल्ल्या असे आता समजायचे काय? असे प्रश्नही ठाकरे गटाने विचारले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडसंबंधी मोठी अपडेट

मोदी ‘विश्वगुरू’ बनल्याने चिनी ड्रॅगनसुद्धा भारतासमोर आता ‘म्यांव’ झाला आहे, असे ढोल मोदीभक्तांनी पिटले. मात्र हे ढोल चिन्यांनी लडाखचा भूभाग ताब्यात घेऊन, पाकड्यांनी जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ले कमी न करून तर बांगलादेशने हिंदूंवरील अत्याचार न थांबवून फोडले. नेपाळसारखे राष्ट्रदेखील आज भारताकडे डोळे वटारून पाहू लागले आहे, याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहेत.

- Advertisement -

भारत हा सुरक्षेच्या दृष्टीने भाग्यवान नाही, हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे म्हणणे खरेच आहे आणि गेली दहा वर्षे सत्तेत असणारेही हे ‘दुर्भाग्य’ बदलू शकलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. फक्त त्याचे उत्तरदायित्व सध्याचा सत्तापक्ष स्वीकारणार का? हा खरा प्रश्न असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. (SS UBT Vs BJP: Thackeray group criticizes Modi government on Indian border security)

हेही वाचा – Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांच्या भावाने घेतली सीआयडीची भेट; अधिकाऱ्यांनी दिले हे आश्वासन


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -