Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश SSC GD Constable Notification 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबर भरती प्रक्रिया स्थगित

SSC GD Constable Notification 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबर भरती प्रक्रिया स्थगित

Related Story

- Advertisement -

SSC GD Constable Notification 2021 @ssc.nic.in: देशात कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबर भरती २०२१ ची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात ९ एप्रिल रोजी स्टाफ सिलेक्शन कमिशनने जाहीर केले होते की, कॉस्टेबल भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जाईल. त्यामुळे अनेकांनी आज नोटिफिकेशन जाहीर होईल असा अंदाज बांधला होता. त्यानुसार आज स्टाफ सिलेक्शन कमिशनने अधिसूचना काढत कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया पुढील आदेश जाहीर येईपर्यंत स्थगित केली आहे असे स्पष्ट केले.

SSC GD Constable Notification 2021 gd constable recruitment exam postponed till further orders
SSC GD Constable Notification 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबर भर्ती प्रक्रिया स्थगिती

- Advertisement -

याचबरोबर आयोगाने कंबाइंड हायर सेकेंडरी परीक्षा (CHSL) आणि कंबाइंड ग्रँज्युएट लेवल परीक्षा (CGL)तील टियर १ परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा २१ मे ते ०७ जून या कालावधीत ऑनलाईन घेण्यात येणार होत्या परंतु याही परीक्षा पुढील आदेश येईपर्यंत घेतल्या जाणार नाहीत. वाढत्या कोरोना संसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या परीक्षा घेणे शक्य नसल्याचे आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे कोरोना परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करत लवकरचं या परीक्षांचा तारखांसंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

कॉन्स्टेबल भरती प्रक्रियेची पहिले नोटिफिकेशन ५ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होते मात्र ते दोन वेळा स्थगित करण्यात आले. परंतु यावेळी आयोगाने जारी केलेल्या नोटीफिकेशनमध्ये कोणताही कोणतीही नवीन संभाव्य तारीख जाहीर केलेली नाही. आयोगाने विद्यार्थ्यांना असे सुचवले आहे की, या परीक्षांसंदर्भात कोणताही माहिती पाहण्यासाठी कमिशनच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जावे.

- Advertisement -