घरक्राइमकॅनडात अज्ञातांच्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी

कॅनडात अज्ञातांच्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी

Subscribe

कॅनडामध्ये रात्री उशीरा अचानक करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण चाकू हल्ल्यात 15 जण जखमी झाले असून यामुळे कॅनडात खळबळ माजली आहे.

कॅनडामध्ये रात्री उशीरा अचानक करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण चाकू हल्ल्यात 15 जण जखमी झाले असून यामुळे कॅनडात खळबळ माजली आहे. (Stabbings In Canada Leave 10 Dead A Dozen Injured 2 Suspects Identified)

या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. या प्रकरणात दोन संशयितांचा शोध घेतला जात आहे. शिवाय, यातल्या दोन हल्लेखोरांची ओळख पटलेली आहे. दोघांचेही फोटो विविध माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

डेमियन आणि माईल्स अँडरसन अशी या दोघांची नावे आहे. हे दोघेही एका काळ्या रंगाच्या गाडीतून आले आणि हल्ला केला अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडे आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी हल्ल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे कॅनडाच्या इतिहासातला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे.

सध्यस्थितीतहल्ला झाल्याच्या भागात अधिक सुरक्षा तैनात करण्यात आली. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी या हल्ल्याला भयंकर आणि हृदयद्रावक म्हटलं आहे. त्यांनी रहिवाशांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, पीडितांवर अचानक हल्ला झाला असावा, असे प्राथमिक संकेत आहेत, परंतु पोलिसांनी कोणतेही संभाव्य कारण दिलेले नाही. रेजिना पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माउंटीजच्या मदतीने ती संशयितांना शोधून त्यांना अटक करण्यासाठी अनेक आघाड्यांवर काम करत आहे. आरसीएमपीच्या म्हणण्यानुसार संशयितांची नावे डॅमियन सँडरसन आणि माइल्स सँडरसन अशी आहेत.


हेही वाचा – नितीश कुमारांना पुन्हा पंतप्रधानपदाचे स्वप्न; विरोधकांची मोट बांधण्याचा उचलला विडा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -