Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश आंध्र प्रदेशात टीडीपीचे कार्यकर्ते भिडले आणि... गमावला आठ जणांनी जीव

आंध्र प्रदेशात टीडीपीचे कार्यकर्ते भिडले आणि… गमावला आठ जणांनी जीव

Subscribe

या घटेनबाबत चंद्रबाबू नायडू यांनी दुःख व्यक्त केले. सभा सुरु असताना या घटनेची माहिती नायडू यांना मिळाली. नायडू हे सभा अर्धवट सोडून थेट रुग्णालयात गेले. तेथे त्यांनी जखमींची विचारपूस केली. तसेच मृत व जखमींसाठी मदत जाहीर केली. मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मदत नायडू यांनी जाहीर केली. जखमींचा उपचार खर्चही केला जाईल, असे नायडू यांनी सांगितले.

हैदराबादः आंध्र प्रदेशात एका राजकीय कार्यक्रमात तेलुगू देशम पार्टीचे (टीडीपी) कार्यकर्ते एकमेकांना भिडले व त्यात झालेल्या हाणामारीत चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आठजणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमीही झाले आहेत.

टीडीपीचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांची कंडुकुरमध्ये सभा होती. त्यावेळी रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. बाचाबाची झाली. हाणामारी झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आठजणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत एका टीडीपी कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

या घटेनबाबत चंद्राबाबू नायडू यांनी दुःख व्यक्त केले. सभा सुरु असताना या घटनेची माहिती नायडू यांना मिळाली. नायडू हे सभा अर्धवट सोडून थेट रुग्णालयात गेले. तेथे त्यांनी जखमींची विचारपूस केली. तसेच मृत व जखमींसाठी मदत जाहीर केली. मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मदत नायडू यांनी जाहीर केली. जखमींचा उपचार खर्चही दिला जाईल, असे नायडू यांनी सांगितले.

एन चंद्राबाबू नायडू राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते आहेत. बुधवारी ते कंडुकुर शहरात एका सभेला संबोधित करणार होते. नायडूंना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. त्याचवेळी कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तिघांचा गुदमरून मृत्यू झाला.

- Advertisement -

पुढच्या वर्षी आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीची तयारी टीडीपी करत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जगन मोहन रेड्डी यांच्या वाईएसआर काॅंग्रेसने टीडीपीचा पराभव केला होता. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीची टीडीपीने जोरदार तयारी सुरु केली आहे. चंद्राबाबू नायडू हे २८ ते ३० डिसेंबर दरम्यान नेल्लोर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांचा दौरा करणार आहेत. याचवेळी ते कवाली, कंदुकुर आणि कोवूर मध्ये विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

तर नायडू यांचा मुलगा नारा लोकेश जानेवारी महिन्यात ४ हजार कि.मीची पदयात्रा करणार आहे. युवा मतदारांना जोडण्याचे काम या पदयात्रेतून केले जाणार आहे. चंद्राबाबू यांची ही शेवटची निवडणूक आले. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्याचा संकल्प टीडीपीने केला आहे.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -