इटलीतल्या चेंगराचेंगरीमध्ये ६ ठार, ३५ जखमी

इटलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ६ जण मृत्यू पावले आहेत. तर, ३५ जणा जखमी झाले आहेत.

Italy stamped
फोटो सौजन्य - AFP

इटलीमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका डिस्कोमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३२ जण जखमी झाल्याची माहिती आता समोर येत आहे. शनिवारी पहाटे ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन मुली, दोन मुलं आणि एका स्त्रीचा समावेश आहे. इटालियन रॅप संगीताचा आनं घेण्यासाठी हे सर्वजण आले होते. दरम्यान मृत झालेली महिला आपल्या मुलांसोबत या ठिकाणी आली होती. पण, काळानं घाला घातल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, जखमींपैकी १२ जणांची प्रकृती ही नाजूक असल्याची माहिती देखील मिळत आहे. दरम्यान, चेंगराचेंगरी झाली त्यावेळी नेमके किती लोक आतमध्ये होते याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. शिवाय, मृतांच्या वयाबाबत देखील कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पेपर स्प्रे मारल्यामुळं गोंधळ उडाला आणि त्यातून चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. चेंगराचेंगरी दरम्यान आपात्कालीन मार्ग बंद होता असं देखील बोललं जात होती. पण, चौकशी समितीनं मात्र आपात्कालीन मार्ग चालू होता असं म्हटलं आहे.