Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशNew Delhi stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीने पंतप्रधान मोदी व्यथित

New Delhi stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीने पंतप्रधान मोदी व्यथित

Subscribe

नवी दिल्ली – नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री 10 वाजता चेंगराजचेंगरीची घटना घडली. यात 18 जणांचा मृत्यू झाला. तर गर्दीत गुदमरल्याने 10 पेक्षा जास्त लोक जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीची घटना ताजी असताना नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर झालेल्या या घटनेने कुंभमेळा प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

प्रयागराज येथील महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्ली स्थानकावरून दोन विशेष रेल्वे सोडण्यात येतात. या रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी शनिवारी (15, फेब्रुवारी) गर्दी उसळली. या गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दिल्ली स्थानकावर पुन्हा चेंगराचेंगरी झाली आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे मी व्यथित झालो. ज्यांनी आपल्या कुटुंबियातील प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या सर्वांना यंत्रणांकडून योग्य ती मदत दिली जाईल.

हेही वाचा : New Delhi Stampede : एक घोषणा अन्…; 18 जणांचा मृत्यू झालेल्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काय घडलेले?

नवी दिल्ली स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची नावे समोर आली आहेत. 18 मृतांमध्ये 14 महिलांचा समावेश आहे. यातील 9 जण हे बिहारमधील आहेत.

1. आहा देवी रविन्दी नाथ, बक्सर बिहार, वय 79 वर्ष
2. पिंकी देवी उपेन्द्र शर्मा, संगम विहार दिल्ली, वय 41 वर्ष
3. शीला देवी उमेश गिरी, सरिता विहार दिल्ली, वय 50 वर्ष
4. व्योम धर्मवीर, निवासी बवाना दिल्ली, वय 25 वर्ष
5. पूनम देवी पत्नी मेघनाथ, सारण बिहार, वय 40 वर्ष
6. ललिता देवी संतोष, परना बिहार, वय 35 वर्ष
7. सुरुचि मनोज शाह, मुजफ्फरपुर बिहार, वय 11 वर्ष
8. कृष्णा देवी विजय शाह, समस्तीपुर बिहार, वय 40 वर्ष
9. विजय साह राम सरूप साह, समस्तीपुर बिहार, वय 15 वर्ष
10. नीरज इंद्रजीत पासवान, वैशाली बिहार, वय 12 वर्ष
11. शांति देवी राज कुमार मांझी, नवादा बिहार, वय 40 वर्ष
12. पूजा कुमार राज कुमार मांझी, नवादा बिहार, वय 8 वर्ष
13. संगीता मलिक मोहित मलिक, भिवानी हरियाणा, वय 34 वर्ष
14. पूनम वीरेंद्र सिंह , महावीर एन्क्लेव, वय 34 वर्ष
15. ममता झा विपिन झा, नांगलोई दिल्ली, वय 40 वर्ष
16. रिया सिंह ओपिल सिंह, सागरपुर दिल्ली, वय 7 वर्ष
17. बेबी कुमारी प्रभु साह, बिजवासन दिल्ली, वय 24 वर्ष
18. मनोज पंचदेव कुशवाह, नांगलोई दिल्ली, वय 47 वर्ष

हेही वाचा : LIVE UPDATE : दिल्ली चेंगराचेंगरीत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू – संजय राऊत