Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश महाराष्ट्रातील राजकारण्यांविरोधात उभे राहा, राऊतांचे बेळगावकरांना आवाहन

महाराष्ट्रातील राजकारण्यांविरोधात उभे राहा, राऊतांचे बेळगावकरांना आवाहन

Subscribe

बेळगाव : कर्नाटक निवडणुकीनिमित्त ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) सध्या बेळगाव (Belgaum) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बेळगावातील जनतेला आव्हान केले आहे. ते म्हणाले की, तुमच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील राजकारणी लोक येतात तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये उभं राहायला पाहिजे.

संजय राऊत म्हणाले की, बेळगावातील जनतेसाठी आम्ही आमची भूमिका मांडली, कारण येथील लोक दहशतीखाली आहेत. त्यांना धमक्या देतात, त्यांच्या घरा-दारावर-शेतावर नांगर फिरवला जातो, बुलडोझर फिरवला जातो. त्यामुळे माझं मत व्यक्त करणं माझ काम आहे. बेळगावातील लोक काळा दिवस पाळतात, रस्त्यावर उतरतात, म्हणतात आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे. मग अशावेळी तुमच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील राजकारणी नेते येतात, तेव्हा तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये उभं राहायला पाहिजे. तुम्ही फक्त कर्नाटक सरकारच्या विरोधात उभ राहून चालणार नाही, त्याला राजकारण म्हणतात. फक्त कर्नाटक सरकारच्या विरुद्ध अत्याचार करतात म्हणून उभं राहायचं आणि तोच अत्याचार करण्यासाठी महाराष्ट्रातून लोक येतात तेव्हा तुम्ही थंड पडतात. असे असेल तर आम्ही प्रचाराला येणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

शरद पवार जाणकार, अनुभवी
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीध्ये घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य केले. संजय राऊत म्हणाले की, सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्या त्यांच्या पक्षातल्या अंतर्गत बाबी आहेत. त्यांच्या पक्षामध्ये कोणी काय निर्णय घ्यायचे हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. आम्ही त्यांच्यामध्ये मत व्यक्त करणे, भूमिका घेणे योग्य नाही. शरद पवार जाणकार आहेत, अनुभवी आहेत. त्याच्यामुळे  ते महाराष्ट्राच्या हिताचा, देशाच्या हिताचा निर्णय घेतील, अशी आम्हाला खात्री आहे.

पवारांसारखे नेते कधी निवृत्त होत नाही
संजय राऊत म्हणाले की, जेव्हा अशी उत्तुंग नेतृत्व पक्षाच्या लीडरशीपपासून दूर होतात. जसे की, सोनिया गांधी, शरद पवार किंवा  बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धाव ठाकरेंना कार्याध्यक्ष केल्यावर आम्ही सातत्याने त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला जात होतो. असे इतर पक्षामध्येसुद्धा होत असते. त्यामुळे शरद पवारांसारखे नेते कधी महाराष्ट्रातून निवृत्त होत नाहीत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -