PM Modi: निवडणूक होणाऱ्या 5 राज्यात Vaccine Certificate वरुन मोदींचा फोटो हटवणार

पाच राज्यात आचारसंहिते दरम्यान जे नागरिक कोरोना लस घेतील त्यांच्या लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो नसेल. आरोग्य मंत्रालयाने २०२१मध्ये देखील अशा प्रकारे पुढाकार घेतला होता.

state assembly polls pm modi picture will not use Vaccine Certificate in 5 states where elections will be held
PM Modi: निवडणूक होणाऱ्या 5 राज्यात Vaccine Certificate वरुन मोदींचा फोटो हटवणार

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आलेले असताना देखील देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूकांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचार संहित लागू झाली आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणावर पंतप्रधान मोदींचा असलेला फोटो काढून टाकण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड,पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांत निवडणूकांच्या आचार संहिता लागू झाल्याने या राज्यातील लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो काढून टाकणार आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाच राज्यात आचार संहिता लागू झाल्याने पक्षांचे ठिकठिकाणी असलेले बॅनर्स, पोस्टर, होर्डिंर्स इत्यादी हटवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच राज्यातील लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो देखील वापरता येणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोविन प्लॅटफॉर्मवर देखील काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ज्यात निवडणूका असलेल्या राज्यांमध्ये पीएम मोदींच्या फोटो काढता येणार आहे. निवडणूकीच्या तारखा जाहिर झाल्यानंतर शनिवारी रात्री हे फिलटर्स लागू करण्यात आले आहेत.

या पाच राज्यात आचारसंहिते दरम्यान जे नागरिक कोरोना लस घेतील त्यांच्या लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो नसेल. आरोग्य मंत्रालयाने २०२१मध्ये देखील अशा प्रकारे पुढाकार घेतला होता. तेव्हा आसाम, केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी राज्यांच्या विधानसभा निवडणूका होत्या.

निवडणूक आयोगाकडून उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब,मणिपूर, गोवा या राज्याच्या विधानसभा निवडूका फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आयोजित करण्यात आल्या असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केली. उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त 7 टप्प्यात मतदान होणार आहे. तर मणिपूरमध्ये १४ फेब्रुवारीला एका टप्प्यात उर्वरीत राज्यामध्ये मतदान होणारआहे.


हेही वाचा – Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर