घरदेश-विदेशअदानी ग्रुपविरोधातील हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर स्टेट बँक ॲक्शन मोडमध्ये

अदानी ग्रुपविरोधातील हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर स्टेट बँक ॲक्शन मोडमध्ये

Subscribe

अमेरिकेमधील फॉरेन्सिक फायनान्शियल कंपनी हिंडनबर्गने एका रिसर्चमधून अदानी ग्रुपवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले. मात्र अदानी ग्रुपने हे सर्व आरोप फेटाळून लावत हा रिपोर्ट भारतातील व्यावसायिकांच्या स्वातंत्र्यावर झालेला नियोजित हल्ला असल्याचं म्हटलं आहे. यानंतर अदानी ग्रुपला दोन लाख कोटींपेक्षा अधिकचं कर्ज देणाऱ्या बँकांनी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यात स्टेट बँक देखील ॲक्शन मोडमध्ये आली आहे.

हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपचे शेअर दणकूण आपटत आहेत. याचा मोठा परिणाम हा शेअर मार्केटवर झाला त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं आहे. तर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

- Advertisement -

देशाची सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँकेने मात्र आपण कर्ज मर्यादेच्या आत दिल्याचं म्हणत काळजीचं काही कारण नसल्याचं सांगितलं आहे. अदानी ग्रुपविरोधात रिपोर्ट आल्यानंतरही एलआयसी, स्टेट बँक यांनी कर्जपुरवठा सुरु ठेवल्याने काँग्रेससह विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. यावर स्टेट बँकेने एक अधिकृत निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्टेट बँकेने निवेदनात म्हटले की, अदानी समूहाला दिलेले कर्ज हे रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या लार्ज एक्सपोजर फ्रेमवर्कच्या मर्यादेत आहे, त्यामुळे दिलेल्या कर्जाला कोणताही धोका नाही. आमच्या कर्जांना धोका उत्पन्न होऊ शकेल अशा घटनांचा आढावा घेण्याची आमची पद्धत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आमचं लक्ष आहे. असंही स्टेट बँकेने स्पष्ट केलं आहे.

स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक स्वामीनाथन यांनी सांगितले की, बँकेकडून मोठ्या कर्जाचा नियमितपणे आढावा घेतला जातो. सद्यस्थितीत काळजीचे कोणतेही कारण दिसत नाही. अदानी समूहाची बहुतांश संपादने ही विदेशी कर्जे किंवा भांडवली बाजारातून झाली आहेत. त्यामुळे भारतीय बँकिंग व्यवस्थेला यामुळे सध्या परिस्थित कोणतीही बाधा असल्याचं चित्र नाही.

- Advertisement -

अदानी ग्रुप यासंदर्भात रविवारी एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. 413 पानांच्या या निवेदनातून अदानी ग्रुपने हिंडनबर्गच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. हिंडनबर्गने 24 जानेवारी रोजी ‘अदानी ग्रुप: हाऊ द वर्ल्डस थर्ड रीचेस्ट मॅन इज पुलिंग द लार्जेस्ट कॉन इन कॉर्पोरेट हिस्ट्री’ नावाने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. याच रिपोर्टला अदानी ग्रुपने निवेदन जारी करत उत्तर दिलं आहे. अदानी ग्रुपने आपल्या निवेदनातून म्हटले की, 24 जानेवारीला मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन हिंडनबर्गता रिसर्च रिपोर्ट वाचून आम्हाला धक्का बसला आहे, आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत. हा रिपोर्ट खोटा आहे. हिंडनबर्गचे दस्ताऐवज निवडक माहितीचे एका वाईन हेतूने केलेले संयोजन आहे, एका विशिष्ट उद्देशाने अदानी ग्रुपला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आले आहेत.


BMC Budget 2023-24 : 2 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प; मुंबईकरांना काय मिळणार?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -