बजेटआधी अनुराग ठाकुर ‘हनुमानाच्या दारी’

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज बजेट सादर केले. या बजेटकडून सर्वसामान्यांच्या खूपच अपेक्षा होत्या. यामुळे बजेट सादर करण्यापूर्वी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी असलेल्या मंदिरात जाऊन हनुमानापुढे मस्तक टेकले. त्यानंतर ते घराबाहेर पडले.

घरातून बाहेर पडताना देवाचे दर्शन करणे शुभ मानले जाते. त्यातच आज शनिवार असल्याने व या दिवशी हनुमानाचे दर्शन घेतल्याने इडापिडा टळते अशी भक्तांची भावना आहे. यामुळे ठाकूर यांच्या या देवदर्शनाने सगळ्यांचेच लक्ष वेधले.

याबद्दल बोलताना ठाकूर यांनी मोदी सरकार सबका साथ, सबका विकास यावर विश्वास ठेवते. त्यातच बजेटबद्दल देशभरातून नागरिकांनी सरकारला सूचना दिल्या होत्या. यामुळे हे बजेट नागरिकांसाठीच असेल असा विश्वास व्यक्त करत  हनुमानदर्शनावर बोलण्याचे मात्र टाळले.