जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जागतिक नेते उपस्थित

state funeral of assassinated ex pm of japan shinzo abe pm modi among world leaders present

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. या अंत्यविधीच्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेते 20 हून अधिक राष्ट्रप्रमुखांसह 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावप टोकियोमध्ये मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

67 वर्षीय आबे यांची 8 जुलै रोजी प्रचारादरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गोळीबारावेळी पोलिसांची उपस्थिती असतानाही हल्लेखोराने हा प्रकार घडवून आणला. शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्काराच्या खर्चाबाबत जपानमध्ये निषेध करण्यात आला. शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्कारासाठी सुमारे 1.7 अब्ज येन (सुमारे 12 दशलक्ष डॉलर) खर्च येईल असे म्हटले जाते. हा कार्यक्रम थांबवण्यासाठी याचिका, निषेध आणि न्यायालयीन आव्हानांचा पंतप्रधान फुमियो किशिदा यांना सामना करावा लागत आहे.

जपानच्या ‘क्योडो’ वृत्तसंस्थेने पोलिस सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये म्हणून पोलिस अतिरिक्त दक्षता घेत आहेत. जपान पोलिसांची टीम प्रमुख रस्ते आणि जे.आर. टोकियो स्टेशन व्यतिरिक्त ज्या ठिकाणी लोकांची गर्दी जमते त्यावरही ते बारीक लक्ष ठेवून आहे. टोकियोमधील निप्पॉन बुडोकन हॉलजवळील उद्यानात आबे यांना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी सर्वसामान्यांसाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचे सरकारने सांगितले.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी टोकियोमध्ये दाखल झाले आहेत. पीएम मोदी म्हणाले की, आज आम्ही या दु:खाच्या काळात भेटत आहोत. आज जपानला आल्यानंतर मला जास्त वाईट वाटतं, कारण मी गेल्या वेळी आबे-सान यांच्याशी खूप वेळ बोललो होतो आणि गेल्यानंतर अशा बातम्या ऐकायला मिळतील असं मला कधीच वाटलं नव्हतं.


शाळेत सरस्वतीचा फोटो का? त्यांची पूजा का करायची? छगन भुजबळांचे वादग्रस्त विधान