घरदेश-विदेशराज्यांना जानेवारीसाठी मिळणार दुप्पट कराची रक्कम, अर्थ मंत्रालयाचा आदेश

राज्यांना जानेवारीसाठी मिळणार दुप्पट कराची रक्कम, अर्थ मंत्रालयाचा आदेश

Subscribe

47,541 कोटी रुपयांचा कराचा आगाऊ हप्ता राज्य सरकारांना जारी केला जाईल. असा आदेश अर्थ मंत्रालयाचा जारी केला आहे. ही रक्कम जानेवारी २०२२ च्या नियमित हस्तांतरणा व्यतिरिक्त आहे. या महिन्यात राज्यांना 95,082 कोटी रुपये मिळणार आहेत. या संदर्भात, जानेवारी 2022 मध्ये राज्यांना एकूण 95,082 कोटी रुपये किंवा त्यांच्या हक्काच्या दुप्पट रक्कम मिळत आहे.

सरकारने 22 नोव्हेंबर 2021 रोजी राज्यांना 47,541 कोटी रुपयांचा कराचा पहिला आगाऊ हप्ता जारी केला होता. आज दुसरा आगाऊ हप्ता जारी केल्यामुळे, राज्यांना कर हस्तांतरण अंतर्गत 90,082 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळेल, जी जानेवारी 2022 पर्यंत जारी करण्यात येणाऱ्या बजेटपेक्षा जास्त आहे.

- Advertisement -

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीएसटी भरपाईच्या कमतरतेसाठी राज्य सरकारांना 1.59 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा जारी केलेला हप्ता ऑक्टोबर 2021 अखेर पूर्ण झाला आहे. राज्यांना बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून केंद्राने आगाऊ रक्कम जारी केली आहे. याद्वारे ते कोविड 19 दरम्यान येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी खर्च करू शकतील.

नोव्हेंबर 2021 मध्ये केंद्राने राज्यांना कराचा वाटा म्हणून 95,082 कोटी रुपयांचे दोन हप्ते जारी केले होते. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, राज्यांना त्यांचा भांडवली खर्च वाढवण्यासाठी मदत करण्यासाठी केंद्र नोव्हेंबर कर हस्तांतरणाची रक्कम दुप्पट करेल.

- Advertisement -

मंत्रालयाने म्हटले होते की, सरकारने राज्य सरकारांना त्यांच्या कर वाट्याचे 95,082 कोटी रुपयांचे दोन हप्ते 22 नोव्हेंबर 2021 रोजी जारी केले. तर सामान्य मासिक हस्तांतरण 47,541 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी, केंद्र सरकारने एका आर्थिक वर्षात 14 हप्त्यांमध्ये राज्यांना गोळा केलेल्या एकूण करांपैकी 41 टक्के रक्कम जारी केली.


देशाला त्रास देत बदनाम करणाऱ्यांना भाजपा जास्त संधी देते, मंत्री अस्लम शेख यांचा आरोप


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -