घर देश-विदेश राज्याचे राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर; महाराष्ट्रातून उचलबांगडी होणार का?

राज्याचे राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर; महाराष्ट्रातून उचलबांगडी होणार का?

Subscribe

मुंबई – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. आज आणि उद्या ते दिल्लीत असणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते बरेच चर्चेत होते. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांना तंबी देण्याकरता त्यांना दिल्लीत बोलावले असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे दिल्ली दौऱ्यात ते कोणाला भेटतात आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा मला न बोलण्याचे आदेश, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा खुलासा

- Advertisement -

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षान्त समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो आहेत, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. यावरून महाराष्ट्रात प्रचंड वाद निर्माण झाला होता. राज्यापालंचा राज्यभर निषेध करण्यात आला. खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी राज्यपालांना निषेध नोंदवला होता. तसंच, उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं.

हेही वाचा – राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यावर उदयनराजे भोसले संतापले; म्हणाले…

- Advertisement -

न बोलण्याचे दिले आदेश

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मुंबईबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी त्यासंदर्भात माफीदेखील मागितली आहे. दरम्यान, माध्यमांशी न बोलण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्याचा खुलासा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे.

- Advertisment -