Emergency In Shri Lanka : श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी लागू; राजपक्षे सरकारच्या राजीनाम्याची मागणी

आता श्रीलंकेच्या सरकराविरोधात आरोग्य, टपाल, बंदर आणि इतर सरकारी सेवांमध्ये सहभागी बहुतांश कामगार संघटनांनी देखील संपात उडी घेतली आहे. यामुळे श्रीलंकेतील व्यासायिक क्षेत्रावर परिणाम दिसून येत आहे.

state of emergency will be declared by president of sri lanka from friday midnight
Emergency In Shri Lanka : श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी लागू; राजपक्षे सरकारच्या राजीनाम्याची मागणी

श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होतय. याचा पार्श्वभूमीवर श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी ही आणीबाणीची घोषणा केली आहे. आणीबाणीआधी आर्थिक संकटाचा सामना करणारी जनता रस्त्यावर उतरून आता सरकारविरोधात निदर्शने करत होती. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. आणीबाणी लागू झाल्याने आता श्रीलंकेतील पोलिसांच्या हाती अधिकार आले असून पोलीस आणि सुरक्षा दल कोणालाही मनमानीपणे अटक करु शकतात किंवा हवे तेव्हा ताब्यात घेऊ शकतात.

राष्ट्रपती राजपक्षे यांनी आणीबाणीचा निर्णय जनतेच्या सुरक्षेसाठी तसेच अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु राहण्यासाठी घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान श्रीलंकेतील जनतेकडून राष्ट्रपती आणि सरकारच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असल्याने आणीबाणी लागू करण्यात आल्याचे म्हटले जातेय. या आणीबाणीमुळे आता पोलीस आणि सुरक्षा दलांना विशेष अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे आणीबाणीच्या काळात संशयितांना अटक करु शकतात किंवा ताब्यात घेऊ शकतात.

दरम्यान यापूर्वी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेर 1 एप्रिल रोजी जनतेने केलेल्या निदर्शनामुळे आणीबाणी लागू करण्यात आली होती. ही आणीबाणी 5 एप्रिल रोजी मागे घेण्य़ात आली. मात्र आता पुन्हा तिच परिस्थिती उद्भवल्याने राष्ट्रपतींनी आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली.

श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरलेले राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या सरकारने राजीनामा देण्याची मागणी सातत्याने होत आहे. दरम्यान विरोधी पक्षानेही सरकार आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. मात्र बहुमतासाठी मंत्र्याची संख्या कमी पडत असल्याने ते शक्य झाले नाही.

आता श्रीलंकेच्या सरकराविरोधात आरोग्य, टपाल, बंदर आणि इतर सरकारी सेवांमध्ये सहभागी बहुतांश कामगार संघटनांनी देखील संपात उडी घेतली आहे. यामुळे श्रीलंकेतील व्यासायिक क्षेत्रावर परिणाम दिसून येत आहे.


इंदौरमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू तर अनेकजण जखमी