घरदेश-विदेशधर्म संसदेतून निघालेल्या गोष्टी हिंदुत्वाच्या व्याख्येत बसत नाहीत, मोहन भागवतांचा टोला

धर्म संसदेतून निघालेल्या गोष्टी हिंदुत्वाच्या व्याख्येत बसत नाहीत, मोहन भागवतांचा टोला

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी धर्मसंसदेच्या बॅनरखाली आयोजित एका कार्यक्रमात हिंदुत्वाच्या चर्चांवर एक मोठं विधान केलं आहे. “धर्म संसदेतून निघालेल्या गोष्टी हिंदू आणि हिंदुत्वाच्या व्याख्येत बसत नाहीत, असा टोला मोहन भागवतांनी लगावला आहे. केव्हाही रागाच्या भरात काहीही बोलल्या गेलेल्या गोष्टी हिंदुत्व नसते असही ते म्हणाले आहेत.

मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत म्हणाले होते की, “आरएसएस आणि हिंदुत्वावर विश्वास ठेवणारे लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. खरे तर, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हरिद्वार येथे झालेल्या धर्म संसदेत मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आले होते, तर रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल अशोभनीय वक्तव्य करण्यात आले होते”.

- Advertisement -

“वीर सावरकर हिंदू समाजाची एकता आणि संघटन याबद्दल बोलले होते, यावर त्यांनी भगवद्‌गीतेचा देत सांगितले होते की, कोणाला संपवण्याचा किंवा इजा करण्याच्या यात संदर्भ नाही,” असा दावाही त्यांनी केला.

भारत ‘हिंदू राष्ट्र’ होण्याच्या मार्गावर आहे का?

भारत ‘हिंदू राष्ट्र’ होण्याच्या मार्गावर आहे का? या प्रश्नावर मोहन भागवत म्हणाले की, “हे हिंदु राष्ट्र बनवण्याबाबत नाही. भले एखाद्याने स्वीकारावे किंवा स्वीकारून नये. पण हे तेच (हिंदू राष्ट्र)आहे. आपल्या राज्यघटनेचे स्वरूप हिंदुत्ववादी आहे. देशाच्या अखंडतेची भावनाही तशीच आहे. राष्ट्रीय अखंडतेसाठी सामाजिक समता कधीही आवश्यक नसते. फरक म्हणजे वेगळे होणे नव्हे.”

- Advertisement -

“संघाचा विश्वास लोकांमध्ये फूट पाडण्यात नसून त्यांच्यातील मतभेद दूर करण्यात आहे, यातून निर्माण झालेली एकजूट अधिक मजबूत होईल. आम्हाला हे काम हिंदुत्वाच्या माध्यमातून करायचे आहे.” असही ते म्हणाले.

“वीर सावरकरांनीही सांगितले होते की, जर हिंदू समाज एकजूट आणि संघटित झाला तर ते भगवद्गीतेबद्दल बोलतील, कोणाला संपवण्यावर किंवा इजा करण्यावर बोलणार नाही.” असं देखील सरसंघचालक मोहन भागवत सांगितले.

 


pakistan tribute lata mangeshkar : ‘जगाने एक महान गायक गमावला’ लतादीदींच्या निधनामुळे पाकिस्तान हळहळला


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -