Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश इंदूरच्या विहीर दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू; SDRF, NDRF, लष्कर आणि पोलीस दल...

इंदूरच्या विहीर दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू; SDRF, NDRF, लष्कर आणि पोलीस दल तैनात

Subscribe

Stepwell collapse at Indore temple | इंदूर – रामनवमीनिमित्त इंदूरच्या बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात घडलेल्या अपघातात आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रात्री १२ ते दीड वाजण्याच्या सुमारास बचाव पथकाने १६ मृतदेह बाहेर काढले. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या ३५ वर पोहोचली आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू असून मृतांची ओळख पटवली जात आहे. १८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले, तर एकजण अद्यापही सापडलेला नाही.

रामनवमीनिमित्त गुरुवारी झुलेलाल मंदिरात हवन-पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक भाविकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, मंदिर परिसरात असलेल्या विहिरीच्या छतावर अनेक भाविक उभे होते. परंतु, छतावर अनेकजण उभे राहिल्याने छत अचानक विहिरीत कोसळले. परिणामी छतावर उभे असणारे भाविकही विहिरीत कोसळले. ही विहीर ४० फूट खोल असून यात भरपूर पाणीही होते. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने लोकांना विहिरीतून बाहेर काढले.

- Advertisement -


मंदिर परिसराचा रस्ता अरुंद होता, तसंच, विहिरीतही पाणी होतं त्यामुळे बचावकार्यास अडथळे निर्माण झाले. यामुळे पंपाच्या सहाय्याने आधी विहिरीतील पाणी काढण्यात आले. विहिरीतील पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. एसडीआरएफचे डीआयजी महेशचंद्र जैन यांनी सांगितले की, विहिरीत खूप पाणी होते, काहीही दिसत नव्हते. पाणी कमी झाल्यानंतर त्यात आणखी मृतदेह दिसले. SDRF, NDRF, लष्कर दल, पोलीस आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. सुरुवातीला सुमारे 20 जणांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. यातील जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले.

बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिर, स्नेह नगर, सपना संगीता रोड येथे हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विहीरीवरील छत वजनामुळे कोसळले त्यामुळे त्यावर उभी असलेली माणसेही विहीरीत पडली. हे मंदिर सुमारे 60 वर्षे जुने आहे. या घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मंदिराचे पुजारी लक्ष्मीनारायण शर्मा यांनी सांगितले की, ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. रामनवमीच्या दिवशी रामाच्या आरतीची तयारी सुरू होती. तेवढ्यात हा भीषण अपघात झाला. मीही विहिरीत पडलो. परंतु, मला पोहता येत होते त्यामुळे मी पोहत वर आलो. मला त्यावेळी काही जणांचे मृतदेह तरंगताना दिसले. शिवरात्रीला यापेक्षाही जास्त गर्दी होती, तेव्हाही काही झाले नाही. होम-हवन नेहमी बाहेर होतो, पण यावेळी नवीन मंदिर बांधले जात असल्याने हवन आतच झाले. मी 2007 पासून मंदिरात पूजा करत आहे.” सध्या या पुजाऱ्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत जाहीर

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. जखमींवर सरकार उपचार करणार आहे. तर, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये न देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.

ओळख पटलेल्या मृतांची नावे

लक्ष्मी (70) पती रतीलाल पटेल, पटेल नगर
इंद्रकुमार (५३) वडील थमवदास हरवानी, साधू वासवानी नगर
भारती कुकरेजा (५८) पती परमानंद कुकरेजा, साधू वासवानी नगर
जयवंती (84) पती परमानंद खुबचंदानी, स्नेह नगर
दक्षा पटेल (60) पती लक्ष्मीकांत पटेल, पटेल नगर
मधु (48) पती राजेश भम्मानी, सर्वोदय नगर
मनीषा मोटवानी पती आकाश मोटवानी, साधू वासवानी नगर
गंगा पटेल (58) पती गगन दास, पटेल नगर
कनक पटेल (32, रा. पटेल नगर
पुष्पा पटेल (४९), पटेल नगर
भूमिका खानचंदानी (३१, रा. पटेल नगर.
करिश्मा वाधवानी

- Advertisment -