कोरोनाबाबत WHO चं मोठं विधान; महामारी अद्याप संपलेली नाही, अजून बराच पल्ला गाठायचाय

still a long way to go corona epidemic is not over said who chief

कोरोना महामारीचे संकट अद्याप जगभरातून संपण्याचे नाव घेत नाही. मात्र गेल्या दोन वर्षांपेक्षा आता कोरोनाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली आहे. गेल्या तीन वर्षातील कोरोना आकडेवारी आता घसरल्याचे पाहायला मिळत आहे. यात आता जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी कोरोनाबाबत एक मोठ विधान केलं आहे. WHO प्रमुखांनी गुरुवारी कोविड-19 महामारीचा अंत जवळ आल्याचा त्यांचा दावा फेटाळून लावत म्हटले की, कोरोना संकटाचा अंत घोषित करण्यासाठी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मात्र गेल्या आठवड्यात WHO चे प्रमुख टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी पत्रकारांशी बोलताना, जगभरातून कोरोना महामारी संपुष्टात आणण्यासाठी यापेक्षा चांगली स्थिती नसल्याचे म्हणत कोरोनाचा अंत जवळ आल्याचे दावा केला होता. मात्र आज हा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, युनायटेड स्टेट्समध्ये कोरोना महामारी संपुष्टात येत आहे. मात्र न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बाजूला गुरुवारी पुन्हा मीडियाशी बोलताना टेड्रोस यांनी कमी उत्साहित होत म्हटले की, कोरोनाचा अंत जवळ आला याचा अर्थ असा नाही की, कोरोना महामारी पुर्णपणे संपली आहे.

पण कोरोना महामारीचा अंत करण्यासाठी जग आतापर्यंतच्या सर्वोत्तम स्थितीत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. कारण सध्या कोरोना साप्ताहिक मृत्यूच्या संख्येत घट होत आहे. जानेवारी 2021 मध्ये शिखरावर असलेली कोरोना रुग्णसंख्या आता फक्त 10 टक्क्यांवर राहिली आहे.

टेड्रोस म्हणाले की, जगातील दोन तृतीयांश लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, ज्यात तीन चतुर्थांश आरोग्य कर्मचारी आणि वृद्ध लोकांचा समावेश आहे. आपण अडीच वर्षे काळ्या सावटेखाली गेले. आता आपल्याला या काळ्या सावटातून प्रकाश दिसू लागला आहे, मात्र अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. अजून काळी सावट बाकी आहे, आपण लक्ष न दिल्यास अनेक अडचणी आपल्याला सतावू शकतात, असेही ते आवर्जून म्हणाले.


कोरोनाचा अंत आला जवळ, सर्वांनी प्रयत्न केल्यास…; WHO च्या प्रमुखांचे मोठे वक्तव्य