घरताज्या घडामोडीशेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 878 अंक, तर निफ्टी 18414 वर स्थिरावला

शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 878 अंक, तर निफ्टी 18414 वर स्थिरावला

Subscribe

दोन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 878 अंकांच्या घसरणीसह 61,799 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टी निर्देशांक 245 अंकांच्या घसरणीसह 18414 अंकांवर स्थिरावला आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी फक्त एनटीपीसी आणि सन फार्मा हिरव्या चिन्हावर व्यवहार करताना दिसले. दुसरीकडे टेक महिंद्रा, टायटन, इन्फोसिस, एचडीएफसी आणि आयटीसीच्या शेअर्समध्येही घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 30 पैशांनी घसरला आणि 82.76 रुपयांवर स्थिरावला.

निफ्टीतील टॉप गेनर्स आणि लूझर्स शेअर्स

- Advertisement -

सकाळच्या सत्रात BSE सेन्सेक्स 74 अंकांसह 62603 वर उघडला होता, तर निफ्टीने 18 अंकांच्या घसरणीसह 18642 वर व्यापार सुरू केला होता. आज सकाळी बाजारात घसरण झाली असली तरी बँक निफ्टी, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा निफ्टी रिअल इस्टेट आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स वधारत आहेत.

- Advertisement -

IRCTC च्या समभागांमध्ये पाच टक्क्यांनी घसरण

भारतीय रेल्वे कॅटरिंग अँण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) चे शेअर्स देशांतर्गातील शेअर बाजारात पाच टक्क्यांनी घसरून 697 वर स्थिरावले आहेत. ऑफर फॉर सेल (OFS)द्वारे IRCTC मधील पाच टक्के हिस्सा विकणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3 लाख कोटींची घट

शेअर बाजारात 3680 शेअर्सची खरेदी-विक्री झाली, त्यामध्ये 2152 शेअर्सचे भाव घसरुण बंद झाले. तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. मार्कट बंद होताना, BSEमधील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 291 लाख कोटी रुपयांवरून 288.36 कोटी रुपयांवर स्थिरावले आहेत.


हेही वाचा : नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; युके न्यायालयाचा दणका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -