Share Market Updates: रशियाच्या युक्रेन हल्ल्यानंतर शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स २ हजार अंकांनी कोसळला

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Ukraine-Russia War) सुरू झाले आहे. युक्रेनमधील काही भागांमध्ये रशियाने हल्ले केले आहेत. रशियांच्या राष्ट्रपतींनी युक्रेन विरोधात सैन्याला स्पेशल ऑपरेशन करणाचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. याचा परिणाम राष्ट्रीय शेअर बाजारावर (Stock Market) झाला आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्याचे समजताच बाजारात चौफेर शेअर्सची विक्री होताना दिसत आहे. प्री-ओपनिंगमध्ये ३ टक्क्यांपासून शेअर बाजार घसरण्यास सुरुवात झाली. आयसीआयसीआय बँकेचा (ICICI Bank) शेअर खुलताच ४ टक्क्यांनी घसरला आहे. सर्व सेक्टोरियल इंडेक्स (Sectorial Index) कोसळले आहेत.

कसा खुला झाला शेअर बाजार

आज शेअर बाजार असा खुला झाला आहे, ज्यामध्ये चारही बाजूला लाल रंग पसरल्याचे दिसत आहे. सेन्सेक्स १८१३ अंकांनी जबरदस्त कोसळून ५५,४१८ खुला झाला. तर निफ्टी ५१४ अंकांनी जोरदार घसरून १६,५४८ने खुला झाला.

दरम्यान आज सर्व क्षेत्रात विक्रीचा मारा सुरू आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे अर्थव्यवस्थेवरील होणार परिणाम यांची चिंता गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे प्रचंडमध्ये विक्री होत आहे. सेन्सेक्स मंचावरील सर्व ३० शेअर कोसळले आहेत. एसबीआय, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, टीसीएस यांच्या शेअरमध्ये मोठी घसरली झाली आहे. निफ्टीमध्ये २ ते ३ टक्क्यांनी घसरण झाली असून यामध्ये बँकांच्या शेअर्सना मोठा झटका बसला आहे. अदानी पॉवर, पीएनबी, बँक ऑफ बडोदा, टाटा मोटर्स, येस बँक, धनी सर्व्हिसेस, सेल या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.


हेही वाचा –Crude Oil Price: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम थेट भारतात, २०१४ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमतीने गाठला उच्चांक